Beard Rope Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Beard Rope Viral Video: ही कसली फॅशन! दाढीची बांधली वेणी...; तरुणाच्या अतरंगी स्टाईलचा VIDEO जोरदार व्हायरल

Beard Viral Video: उर्फी जावेदपासून ते बॉलिवूडमधील विविध कलाकार देखील हटके फॅशन करताना दिसतात.

Ruchika Jadhav

Beard Style Viral Video:

नव्या पिढीतील तरुणाई काय फॅशन करेल आणि काय नाही याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर नेहमीच अतरंगी फॅशनचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. उर्फी जावेदपासून ते बॉलिवूडमधील विविध कलाकार देखील हटके फॅशन करताना दिसतात. कोणी केसांची फॅशन करतं तर कोणी कपड्यांची. अशात आता एका व्यक्तीने चक्क दाढीची फॅशन केली आहे.

तरुणाने अशी फॅशन केलीये की व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल ही कसली फॅशन. त्याने स्वत:ची दाढी अगदी लांबलचक वाढवलीये. एखादी तरुणी ज्या पद्धतीने केसांची वेणी बांधते अगदी तसंच या तरुणीने आपली दाढी विंचरलीये आणि त्याची वेणी बांधण्याचा प्रयत्न केलाय. तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, त्याने सुरूवातीला आपली दाढी मोकळी केलीये. केसांतला गुंता काढूनल घेतलाय. त्यानंतर रब्बरच्या सहाय्याने केसांना वेणीसारखा आकार देत बांधून घेतलंय.

तरुणाने ही फॅशन करताना आपलं टक्कल ठेवलंय. तसेच शरीरावर बरेच टॅटू बनवलेत. डोक्यावर टक्कल आणि दाढीच्या केसांची वेणी अशा पद्धतीची ही फॅशन पाहून सारेच चकित झालेत. @bebeautymood या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. आतापर्यंत या व्हिडीओला २ लाखांहून अधिक लाइक्स मिळालेत.

अनेक ठिकाणी ऑफिसमध्ये व्यवस्थित दाढी करावी लागते. काही ठिकाणी क्लिन दाढी देखील करण्यास सांगतात. कामाच्या ठिकाणानुसार तरुण आपल्या दाढीला डिझाइन करतात. मात्र या तरुणाची डिझाइन अन् फॅशन डोकं चक्रावणारी आहे. आतापर्यंत या व्हिडीओला २ लाखांहून अधिक लाइक्स आलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

SCROLL FOR NEXT