Bhindi Samosa  Saam Tv
व्हायरल न्यूज

Bhindi Samosa Video: इंटरनेटवर व्हायरल होणारा 'भेंडी समोसा' आहे तरी कसा? पाहा VIDEO

Rohini Gudaghe

Viral Video News

समोसा हा जवळपास प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ आहे. आपल्याकडे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी समोसा खाल्ला जाते. देशात समोशावर प्रेम करणारे अनेक लोकं आहेत. आतापर्यंत समोस्याच्या (Man Prepare Bhindi Samosa) आतमध्ये आपण बटाट्याच्या चटणीचं स्टफिंग बघितलेलं आहे. पण या समोश्यामोध्ये भेंडी असली तर? तु्म्हाला खायला आवडेल का? (latest viral news)

सोशल मीडियावर सध्या असाच एक भेंडी समोश्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर खाद्यपदार्थांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. नेटकरी अशा व्हिडिओंना पसंती देताना देखील (Bhindi Samosa) दिसतात. अनेकदा वेगवेगळ्या डिश बनवताना अनोखे जुगाड केलेले असतात, तर बऱ्याचदा दोन पदार्थ एकत्र करून तिसरी डिश बनवली जाते. अनेकदा या रेसिपी अतरंगी असतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सोशल मीडियावर भिंडी समोसा व्हायरल

इंटरनेटवर खाद्यपदार्थांचे प्रायोगिक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल (Video Viral On Social Media) होतात. त्यामुळं अनेकदा जेवण चविष्ट बनतं, तर अनेकदा जेवण बिघडतंही. लोकं फेमस होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी सोशल मीडियावर अपलोड देखील करत असतात.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक विक्रेता त्याच्या गाडीवर भिंडी समोसा विकत आहे. तो समोसा हातात घेतो. फोडून त्यातील भराव उलगडतो, त्यात बटाट्याऐवजी मसाला भेंडी (Bhindi Samosa Video Viral) दिसते. यासोबत बटाटा, चणा करी आणि हिरवी चटणीसोबत तो हा समोसा सर्व्ह करतोय. शेवटी कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून खायला ग्राहकाला दिली जाते. व्हिडिओ दिलेल्या कॅप्शननुसार, (viral) या एका प्लेटची किंमत प्रति प्लेट 30 रुपये असल्याची माहिती मिळतेय.

व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया

ही क्लिप इन्स्टाग्रामवर foodi_ish नावाच्या अकाऊंटवर शेअर केली गेली (Viral Video) आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. एका यूजरने लिहिलंय की, 'भाई, समोश्याचं काय होत आहे? 'तर दुसऱ्याने लिहिलंय की, 'अशी माणसे कुठून येतात? याशिवाय इतर अनेक युजर्सनी यावर कमेंट करून आपापली प्रतिक्रिया (Viral News) दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

SCROLL FOR NEXT