Mumbai Local Train Stunt Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral VIdeo: हुल्लडबाजांनो, स्टंटबाजी बेतेल जीवावर, धावत्या लोकलला लटकून पुन्हा स्टंटबाजी; पाहा व्हिडिओ

Mumbai Local Train Stunt Viral Video: अनेक स्टंटबाजांचे जीव गेल्यानंतरही मुंबईतल्या धावत्या लोकलमधली स्टंटबाजी थांबायला तयार नाही. मुंबईतल्या धावत्या हार्बर लोकलमध्ये टवाळखोरांनी अशीच स्टंटबाजी केल्याचा प्रकार पुढे आलाय.

Tanmay Tillu

मुंबईतील हार्बर रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या दारात लटकून शिवडी रेल्वे स्थानकात स्टंट करणाऱ्या तरुणाचा मध्य रेल्वेच्या माध्यमातून शोध सुरु आहे. लोकल ट्रेनच्या दारात लटकून स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. आरपीएफला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता पोलिसांकडून या टवाळखोराचा शोध सुरु करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एक टवाळखोर लोकल ट्रेनच्या दरवाज्याच्या हँडलला एका हातानं लोंबकळत स्टंट करतो. या टवाळखोर तरुणाचा हात सुटला असता तर होत्याचं नव्हतं झालं असतं.. मात्र त्याची फिकीर न करता हा टवाळखोर रिल्समध्ये झळकण्यासाठी जीवावर उदार होऊन स्टंट करतोय. दरम्यान, याबाबत मध्य रेल्वेनं प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन केलंय.

मध्य रेल्वेचं आवाहन

मध्य रेल्वेनं प्रवाशांना आवाहन केलं आहे की, ''जीवावर बेतेल असा प्रवास करु नका. लोकलने प्रवास करताना आपली काळजी घ्या. इतरांनाही स्टंटबाजी करण्यापासून रोखा. प्रवाशांनी 9004410735 या क्रमांकावर गैरकृत्यांची तक्रार करा.

लोकल ट्रेनमधील टवाळखोरांची स्टंटबाजी नवी नाही. त्यातल्या त्यात हार्बर रेल्वे मार्गावर तर अशा टवाळखोरांची सुळसुळाट आहे. मात्र अशा हुल्लडबाजांमुळे इतरांना जास्त त्रास होतो. त्यामुळे अशा स्टंटबाजांवर आळा घालायला हवा अशी मागणी प्रवाशांमधून होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT