Gulab Jamun Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Gulab Jamun Viral Video: तुम्ही खाताय डर्टी गुलाबजाम? गुलाबजाममध्ये लघवी करताना व्हिडीओ व्हायरल, काय आहे सत्य?

Fact Check: तुम्ही खात असलेले गुलाबजाम डर्टी तर नाहीत ना? कारण एक तरूण गुलाबजामच्या भांड्यात लघवी करत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय आहे?

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

गुलाबजाम म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. अनेकजण जेवणानंतर आवडीने गुलाबजाम खातात? पण याच गुलाबजामचा डर्टी व्हिडीओ पाहून तुमचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडीओत मिठाईवाल्याच्या दुकानात गुलाबजाम भरून मोठं पातेलं ठेवलंय. मात्र गुलाबजामचा पाक आणखी पातळ करण्यासाठी त्यात एक तरूण लघवी करत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यामुळे साम टीव्हीच्या टीमने या व्हिडीओमागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून काय सत्य समोर आलं ते जाणून घ्या..

व्हायरल सत्य

हा व्हिडीओ सर्वप्रथम आशिक बिल्लोटा या व्यक्तीने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्यक्ती गुलाबजाममध्ये बॉटलमधून पाणी ओतत असल्याचं दिसतंय. व्हिडीओ प्रँक करताना या व्हिडीओचा अर्धवट भाग दाखवण्यात आलाय.

त्यामुळे गुलाबजामच्या पातेल्यासमोर उभा असलेला व्यक्ती गुलाबजाममध्ये लघवी करत असल्याचा दावा साम टीव्हीच्या व्हायरल चेकमध्ये असत्य ठरलाय. त्यामुळे या व्हिडिओमुळे पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका.

विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी हा व्हिडिओ विशिष्ट हेतूनं व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे या व्हिडिओवर विश्वास ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

Face Care: पिंप्लस, डाग आणि टॅनिंग कमी करायची आहे? मग हा घरी तयार केलेला कुलिंग फेसपॅक करा ट्राय

Maharashtra News Live Update: डॉ.आनंद नाडकर्णींच्या पार्थिवाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं अंत्यदर्शन

राज्यातील प्रशासनात उलटफेर; 4 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT