रोहित कदम, साम टीव्ही
पैसे काय झाडाला लागलेत का? असं वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल. पण खरंच अशी घटना घडलीय... चक्क झाडावरुन पैशाचा पाऊस पडलाय. झाडावरुन पैशाचा पाऊस पडतोय आणि झाडाखाली काही लोकं पैसे गोळा करताना दिसतायत...पण दिसतं तसं नसतं...
त्याचं झालं असं की एका तरुणाची पैशाने भरलेली बॅग एक माकड जवळच्या झाडावर जाऊन बसलं... काही तरी खायला असेल या अपेक्षेने माकडाने बॅग उघडली, पण बॅगेत खायला नसल्याने बॅगेतील नोटा माकडाने खाली फेकायला सुरुवात केली आणि मग खाली पडलेल्या नोटा गोळा करताना तरुणाची चांगलीच दमछाक झाली...
ही घटना आहे उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहरची... जमिनीत रजिस्ट्री करण्यासाठी या तरुणाने 2 लाख रुपयांची बॅग आणली होती... पण नोंदणी विभागातील मुद्रांक विक्रेत्याकडे जात असताना, एका माकडाने अचानक त्याच्या हातातून बॅग हिसकावून घेतली आणि जवळच्याच एका झाडावर बसून नोटा हवेत उधळल्या...
नोटांचा पाऊस बघून लोकांची मोठी गर्दी झाली... तरुणाची केविलवाणी अवस्था पाहून लोकांनी प्रामाणिकपणा दाखवला आणि पैसे गोळा करण्यास तरुणाला मदत केली... दोन लाखांपैकी जवळपास 1 लाख 98 हजार रुपये परत तरुणाला मिळाले...
अखेर माकडाच्या तावडीतून आपले पैसे परत मिळाल्याने त्या तरुणानं सुटकेचा निःश्वास सोडला..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.