Mosquito Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mosquito Viral Video: डास मारायला गेला अन् पाय मोडून घेतला; व्हिडिओ पाहून म्हणाल आईss गं!

Viral Video : मच्छर मारायला गेला आणि पायाचा हाड मोडून घेतलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral News : पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसांत डासांचा प्रादूर्भाव खूपच असतो. डासांमुळं अनेक आजारही बळावतात. घरात डास आले की आता एक नवी बॅटरी आलीये. पण ती नसेल तर हातात जे मिळेल ते फेकून मारतो. हीच सवय एकाच्या अंगलट आली आहे. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं असं म्हटलं जातं. त्याचाच प्रत्यय या घटनेतून आलाय. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

घरातले मच्छर बाहेर घालवण्यासाठी सदस्यांचे अनेक प्रयत्न सुरू असतात. बाजारात रॅकेटही आलंय. ते विकत घेतात. कुणी अगरबत्ती, कुणी मच्छर कॉइल घेतं. पण घरात मच्छर नको रे बाबा, असंच प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी पैसेही खर्च करतात. पण एका व्यक्तीला याची मोठी किंमत मोजावी लागलेय.

मच्छर मारायला गेला आणि पायाचा हाड मोडून घेतला बिच्चाऱ्याने. अनेकांना प्रश्न पडला असेल की डासाला मारायला गेल्यानं पाय कसा मोडला, पण हे खरंच घडलंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्यक्तीनं डास मारण्यासाठी हातोडी घेतली. पण याच हातोडीने त्याच्या पायाचे हाड मोडले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत नेमकं काय घडलं हे बघायला मिळतं. एका व्यक्तीच्या पायावर डास बसला आहे. डासाला मारण्यासाठी त्या व्यक्तीने हातोडीचा घाव घातला. तो इतक्या जोरात बसला की पायाचे हाड मोडले. एक्स-रेमध्ये हाड मोडल्याचे दिसते.

इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. काही तासांतच या व्हिडिओला लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 'डासांना शिक्षा द्यायला गेले, स्वतःलाच शिक्षा केली'. 'ही पद्धत बरी नव्हे' अशा कमेंट्स युजर्सने केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Salian Death Case: मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात ६ वर्षांनंतर गुन्हा दाखल, मृत्यूमागचं रहस्य उलगडणार

Maharashtra News Live Update: सुनील शेळके यांच्या घरी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना; अजितदादांच्या आठवणीने भावुक

BJP MLA Parag Shah : भाजप आमदार भिकाऱ्याच्या वेशात मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय, सोशल मीडियावर Video व्हायरल

EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

Hair Care: महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स विसरा! केसगळती कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टी ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT