Bathing Cobra Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Bathing Cobra Viral Video : अबब... बाथरूममध्येच नागाला घातली अंघोळ; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video : भलामोठा विषारी नाग बाथरूममध्ये आहे. या नागाला एक तरूण अंघोळ घालतोय.

कोमल दामुद्रे

Bathing Cobra Viral Video :

रस्त्यावरून जाताना भलामोठा साप वीस-तीस फुटांवर जरी नुसता दिसला अंगावर चर्रकन काटा येतो. काहींचे तर डोळे पांढरेफट्ट पडतात. शब्द फुटत नाहीत. जर कुणी तरूण सापाला अंघोळ घालतो, असं सांगितलं तर विश्वासच बसणार नाही. खरंय ना? पण हा व्हिडिओ बघून विश्वास ठेवण्याचा प्रश्नच उरणार नाही, तर खात्रीही होईल. एक तरूण विषारी नागाची अंघोळ करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मजेशीर, सामाजिक संदेश देणारा, निखळ मनोरंजन करणारे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरूण विषारी नागाला अंघोळ घालत आहे, असे त्यात दिसते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडिओमध्ये काय?

भलामोठा विषारी नाग (Snake) बाथरूममध्ये आहे. या नागाला एक तरूण अंघोळ घालतोय. तरूण आणि नागामधील 'मैत्री'चं दर्शन या व्हायरल व्हिडिओमधून (Video) घडतंय. त्या तरुणाच्या चेहऱ्यावर कुठलीही भीती दिसत नाही. तो नागही अंघोळीची मजा घेताना दिसतोय. हा व्हिडिओ कुठला आहे? कधीचा आहे? याबाबत ठोस माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, लाखो लोकांनी तो बघितला आहे. त्यांच्याकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. नागाची अंघोळ घालणाऱ्या तरूणाला जितकी भीती वाटली नसेल, तितका धसका नेटकऱ्यांनी घेतल्याचं प्रतिक्रियांवरून दिसतंय.

वन अधिकाऱ्याकडून शेअर केला व्हिडिओ

विषारी नागाची अंघोळ करतानाचा हा व्हिडिओ एका वन अधिकाऱ्याने 'एक्स'वर (Twitter) शेअर केला आहे. @susantananda3 या अकाउंटवरून तो शेअर केलाय. आगीची का खेळतोय? असा प्रश्न त्यांनी मजेतमजेत का होईना, पण तितकाच गंभीरपणे विचारला आहे. आता असा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चर्चा तर व्हायलाच हवी, असा अलिखितच नियम (Rules) आहे. आपापल्या परीनं प्रत्येक जण व्यक्त होत आहे.

संमिश्र असल्या तरी, काही प्रतिक्रिया बघितल्यास, नागाला अंघोळ घालणाऱ्या तरुणापेक्षा नेटकरीच अधिक घाबरल्याचे दिसून येते. सापाचं विष काढल्यामुळंच त्याची हिंमत झाली असावी, असा अंदाज एकानं व्यक्त केलाय. तर हा दिवस त्याच्यासाठी शेवटचा असू शकतो, असं एका यूजरनं म्हटलं आहे. हा व्हिडिओ बघून मते मांडली जाऊ शकतात. प्रतिक्रियांमधून वाद-प्रतिवादही झाला असेल, पण व्हिडिओच असा आहे की चर्चा तर होणारच!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT