Man Falls In Train Saam TV
व्हायरल न्यूज

Man Falls In Train: ट्रेनच्या दरवाजात तरुणाची जिवघेणी स्टंटबाजी; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

Viral Video:

सध्याचं युग हे सोशल मीडियाचं युग आहे. जगभरात घडणाऱ्या अनेक घटना एका क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पोहचतात.अनेकदा सोशल मीडियावर अशाही काही घटना समोर येतात, ज्या पाहून कधी आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी संतापही होतो. अशातच एका तरुणाला ट्रेनच्या दरवाजात उभे राहिल्याने जीव गमवावा लागलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण धावणाऱ्या रेल्वेमधील दरवाजात उभा आहे. हा तरूण रेल्वेच्या दरवाज्यातून बाहेर डोकावत आहे. तो मस्त बाहेर डोकावत वाऱ्याचा आनंद घेताना दिसतोय. तेवढ्यातच बाहेर डोकावत असताना त्याचं डोकं बाहेरील एका खांबावर आदळतं. त्यामुळ त्याचा हात हँडलवरून सुटतो आणि तरूणाचा तोल जाऊन ट्रेनमधून बाहेर पडतो. ही सर्व घटना दुसऱ्या एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केलीये.

@chemicalburnol या या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. या घटनेचा व्हिडीओ मागे उभ्या असणाऱ्या प्रवाशांनी बनवला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स हैराण झालेत. रेल्वेतून प्रवास करताना बाहेर डोकावू नये, अशी आनाउंन्समेंट रेल्वे स्थानकापासून ट्रेनमध्ये देखील ऐकू येते. मात्र अनेक प्रावासी याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्यात. अनेकांनी हा फेक व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे. मस्त एडिटींग केली आहे. पण पुन्हा असं करू नका, अशी कमेंट एकाने केलीये. तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी पाठवलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT