Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे बाप! भररस्त्यावर तरुणाने आणला हिंस्त्र प्राणी; नागरिकांची पळापळ, थरारक व्हिडीओ व्हायरल

Viral Shocking Video: बेन्टली या कारमधून तरुणाने सिंहाच्या शवकाला आणलं आहे. ही महागडी कार वरच्या दिशेने ओपन असते. अशात सिंहाचे शावक बाहेर पळून येऊ शकले असते.

Ruchika Jadhav

Video:

अनेक व्यक्तींच्या मनात प्राण्यांबद्दल प्रेम असते. त्यामुळे काहींच्या घरी कुत्रा, मांजर, ससा, पोपट असे काही पाळीव प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. सोशल मीडियावर नेहमीच पाळीव प्राण्यांसोबत जमा मस्ती करतानाचे काही अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात सोशल मीडियावर एका व्यक्तीचा आणि त्याच्या पाळीव प्राण्याचा थरारक व्हिडिओ व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाळीव प्राणी आता फक्त कुत्रा, मांजर राहिलेले नाहीत कारण सध्या हिंस्त्र प्राण्यांना पाळण्याचे ट्रेंड सुरू आहे. एका व्यक्तीने अशाच पद्धतीने सिंहाच्या शावकाला पाळलं आहे. एवढंच नाहीतर या व्यक्तीने कारमधून शावकाला फिरवलं देखील आहे.

थायलंडमधील पट्टाया या शहरात ही घटना घडली आहे. बेन्टली या कारमधून तरुणाने सिंहाच्या शवकाला आणलं आहे. ही महागडी कार वरच्या दिशेने ओपन असते. अशात सिंहाचे शावक बाहेर पळून येऊ शकले असते. मात्र त्याच्या गळ्यात त्या व्यक्तीने पट्टा बांधला आहे.

सदर व्यक्ती शावकाला घेऊन येतो तेव्हा रस्त्यावर नागरिकांमध्ये घबराट निर्माण होते. आपला जीव वाचवण्यासाठी लोक थोडी धावपळ देखील करतात. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तेथील राष्ट्रीय उद्यान अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळाली आहे.

हिंस्त्र प्राण्यांना आपल्या घरी पाळण्याची परवानगी मिळवली असली तरी त्या व्यक्तीला असे प्राणी बाहेर घेऊन जाण्याची परवानगी नसते. बाहेर हिंस्त्र प्राणी घेऊन जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. तसेच काही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. जर या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्याला 6 महिन्यांसाठी कारावासाची शिक्षा होऊ शकते. असे येथील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर @bangkokboy17 या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओची नेटकर्ऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत या व्हिडिओ लाखोंच्या घरात लाइक्स आणि व्हुव्ज मिळलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT