Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : घामाघुम अवस्थेत पायाने मळलं समोस्याचं पीठ; संतापजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Malad Viral Video : एका वडापाव विक्रत्याने थेट आपल्या पायांनी समोसासाठी पीठ मळलंय. सदर घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. मनसेचे मलाड उपसचिव शेख जब्बार यांनी हा संतापजनक प्रकार उघडकीस आणलाय.

Ruchika Jadhav

मालाड परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका वडापाव विक्रेत्याने थेट आपल्या पायांनी समोस्याचं पीठ मळलंय. सदर घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. स्थानिकांनी यावर संताप व्यक्त केलाय.

मनसेचे मालाड उपसचिव शेख जब्बार यांनी हा संतापजनक प्रकार उघडकीस आणलाय. त्यांनी आपल्या एक्स अकाउंट व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये सदर घटना मालवणी म्हाडा गेट नंबर 8 येथील असल्याचं सांगितलंय. हा व्हिडिओ वडापाव विकणाऱ्या एका विक्रेत्याच्या घरातला आहे. लोकांच्या जीवाशी खेळत असलेल्या या विक्रेतेवर कारवाई झाली पाहिजे, असं देखील शेख जब्बार यांनी कमेंटमध्ये लिहिलं आहे.

सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मालाड परिसरातून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बाहेरचे समोसे, वडापाव असे पदार्थ नागरिक फार आवडीने खातात. मात्र हे पर्दाथ व्यवस्थित स्वच्छता न बाळगता बनवल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. समोसा बनवतानाचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील येथून पुढे समोसा खाताना १० वेळा विचार कराल.

स्वच्छता न बाळगता पदार्थ बनवल्याने नागरिकांना फूड पॉइजन, विषबाधा देखील होते. काही दिवसांपूर्वी साम टीव्हीने देखील असाच एक प्रकार समोर आणला होता. सकाळ भवन सीबीडी बेलापूर येथे समोर असलेल्या बिकानेर या शॉपमधून आणलेल्या समोसामध्ये चक्क झुरळ सापडलं होतं. त्यानंतर दुकानावर कारवाई करत हे दुकान बंद करण्यात आलं.

तसेच उल्हासनगरमधून देखील असाच एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये एक तरुण अस्वच्छपणे पायांनी समोस्याचं पीठ मळत होता. घटना उघडकीस आल्यावर या तरुणावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Rule: LPG ते पेन्शन; १ डिसेंबरपासून महत्त्वाच्या नियमात बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम

Masti 4 vs 120 Bahadur : '120 बहादूर'च्या कमाईत घसरण, रितेश देशमुखच्या 'मस्ती 4'नं किती कमावले?

Maharashtra Live News Update : अयोध्येत ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात

Sabudana Chivda Recipe: उपवासासाठी शेंगदाणे आणि खोबरे घालून कुरकुरीत साबुदाणा चिवडा कसा बनवायचा?

Gold Price Today: सोन्याला चकाकी! १० तोळे सोन्याच्या दरात १९,१०० रुपयांनी वाढ, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT