Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणांनी डाव साधला; रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंठण केले लंपास; घटना सीसीटीव्हीत कैद

Street Robbery: सोशल मीडियावर नुकताच एका भररस्त्यात घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ पाहून प्रत्येकजण आता रस्त्यावरुन चालणे देखील धोकादायक ठरते असे म्हणत आहेत.

Tanvi Pol

Necklace Theft Video: रस्त्यावरून जात असताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला गेल्याची धक्कादायक घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील गंठणावर लक्ष ठेवून गर्दीच्या भागात हल्ला केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं की, चोरटं महिलेच्या गळ्याशी जवळ जाऊन, चपळाईने आणि सावधपणे गंठण उचलतो आणि नंतर तिथून पळून जातो.

घटना सीसीटीव्हीत कैद

व्हायरल (Viral) होत असलेल्या या घटनेत दोन तरुण दुचाकीवर बसलेले दिसत असून, सुरुवातीस असे वाटते की, रस्त्याच्या कडेला उभे राहून कोणाची वाट पाहत आहेत. असाच काही वेळ जातो. त्यानंतर समोरुन दोन महिला येत असतात.

मात्र तेवढ्याच तरुणांनी आजूबाजूला कोण नसल्याने समोरुन येणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास करताता आणि दुचाकीवरुन पळ काढतात. महिलाही घाबरुन त्यांच्या पाठी पळत जातात. संपूर्ण चोरीची घटना जवळील घराच्याबाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

ही घटना नेमकी कुठल्या शहरातील आहे हे अद्याप समजले नाही. मात्र, सोशल माध्यमांवर घटनेचा व्हिडिओ(Video) तुफान व्हायरल होत आहे. आता तो व्हिडिओ इन्स्टग्रामावरील chhatrapati_sambhajinagar_news या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे शिवाय यावर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात

Horoscope Today: लग्नासाठी स्थळ येणार, नोकरीची संधी मिळणार; या ४ राशींसाठी गुरुवार ठरणार लकी

Crime : लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला अन् कारमधून निघाले; पण 'त्या' एका संशयाने सगळा डाव उधळला!

Anger damages Heart: तणावापेक्षा धोकादायक राग! केवळ ८ मिनिटांचा राग वाढवतोय हार्ट अटॅकचा धोका

Filmmaker Death : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचं निधन, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, बॉलिवूडवर शोककळा

SCROLL FOR NEXT