Madhuri Dixit at Femina Awards 2024 – Original look misused to create a fake viral video saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: फेमिना अवॉर्डमध्ये माधुरीचा बोल्ड लूक? खरंच माधुरीने तोकडे कपडे घातले?

Madhuri Dixit Viral Video Fact Check Deepfake Truth: या व्हिडिओत माधुरीचा बोल्ड लूक दिसतोय...व्हिडीओ व्हायरल करून माधुरीला ट्रोल केलं जातंय... पण हा व्हिडीओ खरा आहे का?... या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Suprim Maskar

हाच आहे तो 10 सेकंदाचा व्हिडीओ... यात माधुरी तोकडे कपडे घातलेली दिसतेय... ती जास्तच बोल्ड दिसतेय... तिने खोल गळ्याचा काळा गाऊन परिधान केलाय...हा व्हिडीओ फेमिना अवॉर्डमधील असल्याचा दावा करण्यात आलाय... पण याच तिच्या ड्रेसिंगवरून आता ट्रोल केल़ं जातंय... एका युजर्सने सोशल मीडियावर काय लिहिलंय बघा, माधुरीला काय झालंय माहित नाही की वयाच्या 59 व्या वर्षी ती तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे...असे अनेक जण माधुरीबद्दल काहीना काही लिहून बदनामी करत आहेत... पण खरंच फेमिना इव्हेंटमध्ये माधुरी बोल्ड लूकमध्ये दिसली का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

व्हायरल झालेला व्हिडिओ एआय-निर्मित

अवॉर्डमध्ये माधुरीने बोल्ड लूक केलेला नाही

फेमिना अवॉर्ड्स 2024 मध्ये काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला

चांगल्या फोटोचा गैरवापर करून बोल्ड व्हिडिओ बनवला

धक-धक गर्ल डीपफेक व्हिडिओंची शिकार बनली

फेमिना अवॉर्डमध्ये माधुरीने हा काळ्या ऑफ-शोल्डर ड्रेप्स असलेला आयव्हरी मिकाडो गाऊन घातला होता, पण व्हिडिओमध्ये दाखवलेला काळ्या रंगाचा प्लंजिंग-नेकलाइन ड्रेस नव्हता... पण माधुरीची बदनामी करण्यासाठी डीपफेक व्हिडीओ तयार करून शेअर केला...यामुळे काही फॅन्स व्हिडीओची पडताळणी न करताच वाईट वाईट कमेंट्स लिहित आहेत... माधुरी ही मोठी अभिनेत्री आहे... तिचे चाहतेही लाखोंच्या संख्येने आहेत... त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली... त्यावेळी आमच्या पडताळणीत माधुरीने बोल्ड कपडे घातल्याचा दावा असत्य ठरला... खोटे व्हिडीओ व्हायरल केल्याने आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं... त्यामुळे व्हिडीओची आधी शहानिशा करा... नंतरच शेअर करा... ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

No PUCC, No Fuel New Rule: आता पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी PUCC आवश्यक; सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जेजुरी गडावर पावसाची हजेरी

Suryakumar Yadav : वर्ल्डकपविजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला हटवलं; टी २० संघातही स्थान नाही- रिपोर्ट्स

Kolhapur Accident: कोल्हापूरात अपघाताचा थरार, भरधाव कार पुलावरून ओढ्यात कोसळली; एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

भाजप शिंदेसेनेचा बिस्मिला करणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा, भाजप शिंदेसेनेचा टप्प्या टप्प्यानं कार्यक्रम करणार?

SCROLL FOR NEXT