Lucknow Car Accident News:  Saamtv
व्हायरल न्यूज

Lucknow Accident: सुसाट कार, मद्यधुंद चालक... ५ जणांना चिरडले, अनेक वाहनांना उडवले; भयंकर अपघाताचा VIDEO

Lucknow Car Accident News: या अपघातात पाच जण जखमी झाले असून अनेक गाड्यांचेही मोठ नुकसान झाले आहे. या भयंकर अपघातानंतर संतप्त जमावाने कार चालकाला बेदम चोप दिला तसेच त्याची गाडीही फोडली.

Gangappa Pujari

UP Accident News: उत्तरप्रदेशातील लखनौमधून एक हिट अँड रनची एक भयंकर घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कार चालकाने अनेकांना चिरडल्याची घटना घडली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून अनेक गाड्यांचेही मोठ नुकसान झाले आहे. या भयंकर अपघातानंतर संतप्त जमावाने कार चालकाला बेदम चोप दिला तसेच त्याची गाडीही फोडली. या अपघाताचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्या लखनौमध्ये एका भरधाव कारने अनेकांना चिरडले. त्यामुळे अनेक जण जखमी झाले. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या क्रेटा कार चालकाने समोर येईल त्याला उडवण्यास सुरुवात केली. या घटनेने रस्त्यावर एकच आरडा ओरडा अन् धावपळ पाहायला मिळाली. परिस्थिती अशी होती की लोक गाडी पकडण्यासाठी मागे धावत होते आणि कारस्वार पुढे येणाऱ्या लोकांना थेट गाडीने उडवत होता.

कारस्वाराने रुमी गेटजवळ पहिल्या एका व्यक्तीला धडक दिली आणि तेथून पळ काढला. त्यानंतर कारस्वाराने क्लॉक टॉवरजवळ तिघांना चिरडले. लोक कार थांबवू लागले तेव्हा त्याने एका ई-रिक्षाला धडक दिली. हे संपूर्ण प्रकरण ठाकूरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हुसैनाबाद चौकीजवळील आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन् चालकाला ताब्यात घेतले.

दरम्यान, संतप्त लोकांनी छोटा इमामबाराजवळ रस्त्यावर कारला घेराव घातला. यानंतर कार चालकाला बेदम मारहाण करून कारची काचही फोडली. माहिती मिळताच मोठा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले. या प्रकरणी स्थानिक लोकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासही सुरू करण्यात आला आहे. या भयंकर अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT