Lonavala Bhushi Dam Video Saam TV
व्हायरल न्यूज

Bhushi Dam News : जीव गेला तरी चालेल, पण सेल्फी घेणारच! भुशी डॅमवर पर्यटक घालताहेत जीव धोक्यात, धक्कादायक VIDEO

Lonavala Bhushi Dam Video : लोणावळ्यातील भुशी डॅमवर एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा सेल्फी घेण्यासाठी पर्यटक जीव धोक्यात घालत असल्याचं समोर आलं आहे.

Satish Daud

दिलीप कांबळे, साम टीव्ही मावळ

लोणावळ्यातील भुशी डॅमवर एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा सेल्फी घेण्यासाठी पर्यटक जीव धोक्यात घालत असल्याचं समोर आलं आहे. भुशी डॅमवर पर्यटक तुफान गर्दी करत असून सेल्फी घेण्यासाठी जीव घोक्यात घालत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या हुल्लडबाज पर्यटकांना तातडीने आवरा अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

सध्या लोणावळ्यात तुफान पाऊस सुरू असून भुशी डॅम ओव्हर प्लो झालाय. त्यामुळे इथे पर्यटनासाठी राज्यभरातून पर्यटक दाखल होत आहे. अशातच सेल्फी आणि रिल्स काढण्यासाठी तरुणाई भुशी धरणाच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात उतरत आहेत. आपला जीव धोक्यात घालून केवळ रिल्स आणि एका फोटोसाठी हे पर्यटक भुशी धरणाच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात उतरले आहेत.

पोलीस आणि जीवरक्षक हे मज्जाव करत असताना देखील हे पर्यटक पाण्याच्या प्रवाहात जात आहेत. लोणावळा दुर्घटनेनंतर देखील पर्यटकांना शहाणपण आलं नसल्याचं यातून अधोरेखित होत आहे. दरम्यान पर्यटकांची हुल्लडबाजी पाहून पोलीस देखील अॅक्शन मोडवर आले आहेत. भुशी धरणाच्या प्रवाहात तसेच पायऱ्यांवर जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT