lion Crocodile Fight Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Lion vs Crocodile: एकाच भक्ष्यावरुन सिंह आणि मगरीची थरारक झुंज; शेवटी कोण जिंकलं, पाहा VIDEO

lion Crocodile Fight Viral Video :या व्हिडिओमध्ये मगर आणि सिंहाची भांडणं होताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video :आपण अनेकदा सोशल मीडियावर वन्य प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडिओ पाहतो. परंतु जंगलाचा राजा सिंह आणि जलाशयातील राणी असलेल्या मगरीची भांडण झाली तर? विचार करुनही थरारक दृश्य डोळ्यासमोर उभ राहतं. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये मगर आणि सिंहाची भांडणं होताना दिसत आहेत. एका तळ्यात एक भक्ष्य होते. सुरवातीला त्या भक्ष्यावर सिंह ताव मारताना दिसत आहे. नंतर अचानक एक मगर पाण्यात येते. आणि ती पण त्या भक्ष्यावर तुटून पडते.

एका भक्ष्यासाठी त्या दोघांमध्ये भांडण होताना दिसत आहे. ते दोघेही त्या भक्ष्यावर डोळा ठेवून असतात. दोघांमध्ये खूप झटापट होते. त्यानंतर सिंह अजून उग्र रुप धारण करतो. सिंह मगरीवर पंजा उगारतो आणि तिच्यावर हल्ला करतो. व्हिडिओ पाहताना सिंहाने मगरीला कानाखाली मारले असल्याचा भास होतो.

जंगलातील ही क्लिप खूपच व्हायरल होत आहे. एका भक्ष्यासाठी मगर आणि सिंहाची झुंज लागलेली दिसत आहे. गढूळ पाण्यात म्हशीचा मृतदेह असतो. सिंह तो खात असतो. नंतर मगर त्या भक्ष्याजवळ जाते. मगरीला जवळ येताना पाहून सिंह तिच्यावर धावून जातो. मात्र, मगरही पळून जाण्याऐवजी सिंहाला भिडते आणि भक्ष्याचा चावा घेते. त्यांची भांडण होत असतानाच सिंह मगरीच्या कानाखाली मारतो.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट केल्यात. 'सिंहाने मगरीला मारलेली कानाखाली खूपच भारी होती' असे एका युजरने लिहले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: जोडीदाराच्या सोबतीने सुखाचे दिवस येणार, ५ राशींचे लोक होणार मालामाल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघात

Gulkand Paan Sharbat Recipe : उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंकला करा टाटा, बाय बाय; प्या गारेगार 'गुलकंद पान सरबत', पोटाला मिळेल थंडावा

Crime News : धक्कादायक! विवाहित महिलेकडून १६ वर्षीय मुलावर बलात्कार; हॉटेलवर नेलं अन्...

Navi Mumbai: दारूसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, लाथाबुक्क्या अन् काठीने बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT