Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवऱ्याशी वाजलं, संतापून कारमधून उतरली, वाघाने जबड्यात धरून नेले, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Shocking Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या अशीच काहीशी घटना घडलेली आहे जी पाहिल्यानंतर हैराण झालेले आहे. नक्की काय घडले ते पाहण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Tiger attack Video: आयुष्य कधी कोणती कलाटणी घेईल, हे कधीत कोणाला माहिती नसते. एका क्षणात सगळं सुरळीत असतं आणि दुसऱ्याच क्षणी मोठा अनर्थ घडला जातो. सध्या असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे, जिथे एका महिलेच्या निर्णयामुळे तिचे संपूर्ण आयुष्य संपुष्टात आलेले आहे.

थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

व्हायरल (Viral)होत असलेल्या या घटनेत तुम्ही पाहू शकता, अचानक एक कार रस्त्याच्या मधोमध थांबली जाते. त्यामधून एक महिला संतापून उतरलेली दिसत असून ती कारच्या दुसऱ्या दिशेच्या दरवाजाजवळ जाते आणि कारचा दरवाजा खोलते. मात्र, तेवढ्यातच रस्त्याच्या दुसऱ्या दिशेला असलेल्या जंगलातून एक वाघ येतो आणि महिलेला जोरात पकडून फरफटत नेतो. परंतू, महिलेचा पती कारमधून उतरेपर्यंत उशीर झालेला होता. सर्व धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.

महिलेचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या पायाखालची जमीनच सरकली. लोकांना हा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून एक्सवरील @crazyclipsonly या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. नेमकी ही घटना कुठली आहे आणि पुढे महिलेला वाचवण्यात यश आले का नाही ते कळू शकलेले नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ (Video) अपलोड होताच तब्बव २.५ दशलक्ष हून अधिकचे व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र अनेकांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहे. त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले,''वाद झाला तरी पती वाचवायला गेला'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''जीवनाचा काही भरवसा नाही'' तर अनेकांनी'' खूप भयंकर घटना आहे'',असे लिहिले आहे.

टीप: महिलेच्या या भयंकर घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

Accident : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! कार ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातील भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले; मात्र दररोज 'इतक्याच' भाविकांना प्रवेश

Cheese Balls Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट चीज बॉल्स, वाचा सोपी रेसिपी

6,600 रुपयांच्या फायद्यासाठी 22 बळी, दारूकांडाची थरारक इनसाईड स्टोरी, आरोपी वानखेडेनं कसा रचला प्लॅन?

SCROLL FOR NEXT