CCTV Footage  Saam Tv
व्हायरल न्यूज

Leopard CCTV Footage : बिबट्याने पोलीस स्टेशनमध्ये घुसून कर्मचाऱ्यांसमोरच केली कुत्र्याची शिकार, थरारक VIDEO व्हायरल

Leopard CCTV Footage : पोलीस स्टेशनमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रविण वाकचौरे

Ratragiri Viral VIdeo :

रत्नागिरीत बिबट्या पोलीस स्टेशनमध्ये शिरल्याचा व्हिडीओ समोर आली आहे. बिबट्यांने पोलीस स्टेशनमध्येच एका कुत्राची शिकार केली. त्यानंतर कुत्र्याला घेऊन पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. पोलीस स्टेशनमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बिबट्या पोलीस ठाण्यात घुसतो आणि कुत्र्याची शिकार करून त्याला पळवून नेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना बुधवारी २४ जानेवारीच्या रात्री रत्नागिरीतील राजापूर पोलीस ठाण्यात घडली. पोलिस ठाण्याच्या आत कुत्रे भटकत होते आणि कुत्र्यांचा पाठलाग करताना बिबट्या आवारात घुसल्याचे व्हिडिओत दिसत आहे. (Latest News)

बिबट्या समोर असल्याचे पाहून तीन-चार कुत्रे पोलीस स्टेशनमध्ये शिरले. या कुत्र्यांचा पाठलाग करत बिबट्याही पोलीस स्टेशनमध्ये शिरतो. काही वेळात एका कुत्र्याची शिकार करुन बिबट्या पोलीस्ट स्टेशनमधून बाहेर जाताना दिसत आहे.

सुदैवाने पोलीस स्टेशनमध्ये बिबट्या घुसल्याचे लक्षात आल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही. या घटनेचा थरारक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT