Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शेतामध्ये बिबट्यांची मस्ती, शेतकऱ्याने मोबाईलमध्ये कैद केला क्षण; पाहा VIDEO

Sangli Leopard viral video: सोशल मीडियावर सध्या सांगली जिल्ह्यातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नेमके काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ पाहाच.

Tanvi Pol

Sangli Viral Video : सोशल मीडियावर वारंवार बिबट्याचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहेत.त्यात सध्या सांगली जिल्ह्यातून पुन्हा एकदा बिबट्यासंबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पोखरणी येथील उसाच्या शेतात दोन बिबटे बिनधास्त खेळताना शेतकऱ्यांना दिसले. शेतकऱ्यांमध्ये दहशत तर पसरली होती. मात्र या बिबट्यांचे मोजमस्ती धाडसाने शेतकऱ्याने आपल्या मोबाईल मध्ये कैद केली आहे.

नेमके काय घडले?

पोखरणी येथील जासूद मळ्यात काही शेतकरी शेतात काम करीत होते. यावेळी उसामध्ये खळखळ आवाज झाल्याने या शेतकऱ्याने उसाच्या शेताकडे जाऊन पाहिले. तर त्यांना दोन बिबटे मोकळ्या जागेत जाऊन खेळत असल्याचे दिसले. दोन बिबट्यांना (Leopard)खेळताना पाहून शेतकऱ्यांचे धाबे दणाणले.

बिबट्यांच्या बिनधास्त वावरामुळे पोखरणी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या बिबट्यांच्या पायाचे ठसे उमटले आहेत. वन विभागाने या बिबट्यांना जेरबंद करावे अशी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

saamtvnews या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ(Video) अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड होताच कॅप्शनमध्ये,'' मौज मस्तीचा व्हिडिओ शेतकऱ्यांनी केला आपल्या मोबाईल मध्ये कैद..''व्हिडिओत नेमके काय आहे ते लिहिले आहे.आतापर्यंत व्हिडिओला अनेक लाईक्स मिळाले आहे तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओला शेअर करण्यात येत आहे.

टीप: सांगलीमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: साखरपुड्यात रक्तरंजित थरार! फोटो काढायला नकार दिल्याने तरुणाची सटकली, वेटरवर धाडधाड गोळ्या झाडल्या

Healthy Breakfast Without Eggs: हेल्दी नाश्त्यात फक्त अंडीच कशाला? या ४ घरगुती पदार्थातून मिळेल भरपूर प्रोटीन, एकदा ट्राय कराच!

Maharashtra Live News Update: चिखला गावात परिस्थिती शांत; नागरिकांचे प्रशासनाला सहकार्य, शांततेचे आवाहन

छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; तब्बल 46 जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

अजब गजब! विहिर चोरीला गेली, शेतकरी आला रडकुंडीला; महाराष्ट्रात कुठे घडला धक्कादायक प्रकार?

SCROLL FOR NEXT