Leopard Into Staff Room Saam TV
व्हायरल न्यूज

Leopard Into Staff Room: बापरे! हॉटेलमध्ये शिरला बिबट्या; सर्व वस्तूंची तोडफोड, घटनेचा थरारत कॅमेऱ्यात कैद

Leopard: एका व्यक्तीच्या घरामध्ये बिबट्या शिरला आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. घटनेचा थरारक व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Jaipur Video:

बिबट्या म्हणजे सर्वात चपळ प्राणी. कोणतंही शिकार बिबट्याच्या तावडीतून कधीच सुटत नाही. बिबट्या रात्रीच्या अंधारत देखील सहज शिकार करतो. अशात गेल्या काही दिवसांत बिबट्यांनी मानवी वस्तीत शिरकाव केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आताही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

एका व्यक्तीच्या घरामध्ये बिबट्या शिरला आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. घटनेचा थरारक व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ @Kaveri या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडीओ पोस्ट करत यावर ही घटना कुठे घडलीये याबाबत देखील माहिती देण्यात आलीये. राजस्थानमधील कनोटा कॅसल हेरिटेज या हॉटलमध्ये ही घटना घडली आहे. हॉटेलमधील ड्रायव्हरच्या रूममध्ये बिबट्या शिरला होता. ड्रायव्हर त्याच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेला होता. त्यावेळी बिबट्या खोलीत आला.

बाहेरुन दरवाजा बंद होता. त्यामुळे बिबट्याने छत फाडलं आणि त्यातून खोलीत प्रवेश केला. आतमध्ये आल्यावर त्याला शिकार मिळेल असं त्याला वाटलं मात्र घरामध्ये कोणीच नव्हतं. त्यामुळे तो अस्वस्थ झाला आणि घरामध्येच सैरभैर फिरू लागला. त्यात या बिबट्याने घराचं मोठं नुकसान केलं. खोलीत असलेल्या काचेच्या आणि अन्य सर्व मौल्यवान साहित्याची त्याने तोडफोड केली.

मुलांना सोडून या घरातील व्यक्ती रुमवर परतला तेव्हा घरात कुणीतरी शिरल्याचं त्याला बाहेरूनच आवाजावरून समजलं. त्यामुळे त्याने अलगद आपल्या खिडकीतून डोकावलं. यावेळी खिडकीतून त्याला बिबट्या दिसला. बिबट्या दिसल्यामुळे त्याने आपल्या कॅमेऱ्यात ही दृश्य कैद केलीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये एअरटेल कंपनीच्या दोघांवर गुन्हा

सावधान, हिमालय विरघळतोय! कोट्यवधी लोकांचा जीव धोक्यात, शास्त्रज्ञांचा इशारा

शिवसेना सुनावणीनंतर राजकीय समीकरण बदलणार? ठाकरे गटाची पक्ष चिन्हाबद्दल पर्यायी मागणी काय?

Mahayuti Clash: महायुतीत दोस्तीत कुस्ती; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची पुण्यात कोंडी?

Thursday Horoscope : गुरुवारी 7 राशींवर संकटांची मालिका? काहींना होणार अचानक धनलाभ, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT