Mumbai Local Fighting Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Fighting Video: बाईsss..! मुंबई एसी लोकलमध्ये दोन पुरुषांमध्ये फुल ऑन राडा; धक्का मारला अन्....

Ac Local Train Viral Video: मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे. नक्की काय घडले लोकल ट्रेनमध्ये ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

सोशल मीडियावर मुंबई लोकल वारंवार चर्चेत येणारा विषय असतो. कधी प्रवाशांच्या गोंधळामुळे तर विविध कारणांमुळे. दरदिवशी लाखोंच्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये क्षुल्लक कारणांवरुन मुंबई लोकलमध्ये टोकाची हाणामारी देखील होत असतं. त्यातच सध्या अशाच एका घटनेने मुंबई लोकल पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मुंबई(Mumbai Viral News) एसी लोकल ट्रेनमधील आहे. जिथे भांडणाचे मुख्य कारण अद्याप समजले नाही. पण व्हिडिओत दिसते की, निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला तरुण अत्यंत रागात आहे आणि समोर असलेल्या एका व्यक्तीशा जोरदार वाद घालत आहे. दुसरा व्यक्तीही रागात असतो अन् त्यातच तरुणाला धक्का मारतो. त्यानंतर हा वाद अत्यंत टोकाचा होतो.

लोकलमधील हा वाद अत्यंत टोकाला जातो की,अन्य प्रवाशांना त्यामध्ये पडावे लागते आणि दोघांना शांत करावे लागले. दरम्यान काहींनी हा प्रकार नेहमीचा आहे म्हणून पाहत राहिले तर काहींनी मोबाईल काढून व्हिडिओ शूट केला आहे. त्यानंतर काही तासांतच प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला आहे.

सध्या हा व्हिडिओ(Mumbai Local Video) इन्स्टाग्रामवरील mirabhayanderkar या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. त्यानंतर तो प्रसिद्ध अशा फेसबूक, ट्वीटर (एक्स)वर शेअर करण्यात आला. काही क्षणात अनेक नागरिकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं की,''नवीन काहीच नाही दररोजच झालं आहे'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''नक्की काय झालं ते समजलं नाही'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तोंड फुगलेला आणि मोठा दिसतोय? फेस फॅट कमी करण्यासाठी घरीच करा 5 सोपे योगा

Maharashtra News Live Update: अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय

Weight Loss : जेवणातला 'हा' छोटासा पदार्थ वजन झटपट करेल कमी, रोज सकाळी रिकाम्या पोटी खा

पुण्यात पहाटेच गोळीबाराचा थरार! पोलिस-गुन्हेगार आमने-सामने; नेमकं काय घडलं?

Ladki Bahin Yojana: वटपौर्णिमेला लाडकीच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये? जून महिन्याच्या हप्ताबद्दल मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT