Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भयंकर! धावत धावत रेल्वे पकडली, पण दोघांना घेऊन पडले, काकांचा जीव थोडक्यात वाचला

Train Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहिल्यानंतर रेल्वे प्रवास करताना तुम्ही अधिक सावधगिरी बाळगाळ. नक्की काय घडले ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Karnataka Shocking Video: धावती ट्रेन पकडू नका असा इशारा आपण स्टेशनवर किंवा जाहिरातींमध्ये, सोशल मीडियावर वारंवार पाहतो आणि ऐकतो. मात्र, दुर्दैव म्हणजे अजूनही काही जण तो दुर्लक्षित करतात आणि जीवाशी खेळ करतात. सध्या एका व्हायरल झालेल्या घटनेत एक प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतो पण पुढे जे घडतं ते अतिशय थरारक होतं.

काय घडलं नेमकं?

ही घटना कर्नाटकमधील एका रेल्वे स्थानकावर घडली. व्हिडिओमध्ये(Video) स्पष्ट दिसतं की,ट्रेन स्टेशनवरुन सुटते आणि तिचा वेगही वाढला जातो. दरम्यान एक काका धावत धावत ट्रेन पकडण्याचा प्रयत्नात असतात त्यासाठी ते धावत जातात आणि ट्रेनच्या डब्ब्याच्या दरवाजाला पकडतात आणि चढतात. मात्र, त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या पुढे असलेल्या दोघांचाही तोल जातो आणि दोघही धावत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर कोसळतात.

या घटनेचा व्हिडिओ स्टेशनवर उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये शूट केला होता. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर अपलोड केला आणि काही मिनिटांतच हा व्हिडिओ फेसबूक, इन्स्टाग्राम आणि एक्स(ट्वीटर) अशा प्रसिद्ध माध्यमांवर शेअरही झाला.अनेकांनी व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे.

स्टेशनवर घडलेला हा अपघात(Accident) कर्नाटकमधील असल्याचे समजत आहे. नुकताच हा व्हिडिओ desi_cravings या इन्स्टाग्राम अकाउंटवर पाहण्यासाठी मिळाला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये नेमकी ही घटना कोणी कैद केली आणि कर्नाटकमधील कुठल्या स्टेशनवरील आहे ते स्पष्ट झाले आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT