Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral News: पाऊस आला अन् धर्माची रेषा मोडून गेला; पुण्यात मुस्लिम रिसेप्शन सोहळ्यात पार पडला हिंदू विवाह

Pune Rain Wedding: सोशल मीडियावर वारंवार नवीन गोष्टी पाहण्यासाठी मिळत असतात. त्यातच पुणे शहरातील एका अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. नक्की काय घडले ते समजण्यासाठी व्हिडिओ पाहाच.

Tanvi Pol

अक्षय बडवे, साम टिव्ही

Pune viral stories: मंगळवारी दुपारी पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पुण्यातील वानवडी भागात एक लग्न सोहळा सुरू होता. अचानक आलेल्या विवाहस्थळी गोंधळ उडाला, मंडपात नातेवाईकांची पळापळ सुरू झाली. मुहूर्ताची वेळ जवळ आली तरी सुद्धा पाऊस काय कमी होईना. या हॉलच्या जवळच मुस्लिम समाजाच्या एक जोडप्याचे रिसेप्सश सुरु होते. मग काय ज्या मंडपात पाणी आलं तिथे होणारं लग्न थेट मुस्लिम समाजाच्या जोडप्याच्या रिसेप्शन येथील हॉल मध्ये पार पडलं आणि अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने. अगदी चित्रपटात वाटेल अशी ही कथा.

सुदैवाने जवळच्या एका हॉलमध्ये मुस्लिम नवविवाहितांचे रिसेप्शन सुरु होते. असा प्रसंग आल्यामुळे हिंदू विवाह (Weeding) सोहळ्यातील वडिलधाऱ्या मंडळींनी त्या मुस्लिम परिवारातील नातेवाईकांकडे विनवणी केली

नेमके घडले तरी काय?

मंगळवारी संध्याकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी पुण्यातील वानवडी मध्ये एका लॉन्स मध्ये कवडे आणि गलांडे पाटील यांच्यात लग्नसोहळ्याचा मुहूर्त होता. लग्नाच्या वेळी अचानक पावसाने( जोर धरला आणि पाहुणे आडोश्याला पांगले. मुहूर्त जवळ आला आणि विवाहस्थळी (wedding venue) गोंधळ उडाला.

त्यांनी कसलेही आढेवेढे न घेता साधारण दीड तासांसाठी त्यांचा लग्न मंडप उपलब्ध करुन दिला. त्यामुळे संस्कृती आणि नरेंद्र यांचा विवाह सोहळा सुखरुप पार पडला. मंगलाष्टक झाल्या, विवाहाच्या सगळ्या विधी उरकल्या, दोन्ही धर्मियांच्या एकत्रित पंगतीही उठल्या.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT