Hingoli Accident Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Hingoli: हिंगोली हादरलं! डंपरने दिसेल त्याला उडवले, दोघांचा मृत्यू; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Hingoli Shocking Video: सोशल मीडियावर सध्या हिंगोली शहरातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये भयंकर अपघात घडलेला आहे. जो परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.

Tanvi Pol

Shocking Viral Video: वीटभट्टीसाठी माती घेऊन जाणाऱ्या डंपरने भरगर्दीच्या बाजारपेठेत अचानक घुसत अनेक नागरिकांना चिरडले. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

अपघात कसा घडला?

व्हायरल(VIRAL) होत असलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, ऐन गर्दीची वेळ असल्याने रस्त्यावर नागरिकांची मोठी गर्दी असून मोठ्या संख्येने वाहनही आहेत. दरम्यान सिग्नल लागला असल्याने रिक्षा आणि दुचाकीस्वार थांबलेले असतात. मात्र, त्याचवेळी भरधाव वेगाने डंपर येतो आणि सिग्नलवर उभ्या असलेल्या रिक्षेला जोरदार धडक देतो. मग सरळ समोर असलेल्या दुकानात घुसतो. संपूर्ण धक्कादायक प्रकार जवळील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ

डंपरची धडक इतकी जोरदार असते,की या अपघातात सहा जण चिरडले गेले असून त्यात लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे यात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

पोलिसांचा तपास सुर

अपघाताची (Accident) माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. डंपरचालकाकडून चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे, अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून मदत कार्य सुरु करण्यात आलेले होते आणि जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT