Nagpur Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Nagpur Viral Video: अपघातानंतरही तरुणीची आरेरावी; नागपुरातील व्हिडिओ व्हायरल

Girl Driving Accident: नागपुर शहरातील मध्यवर्ती भागातील एका घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल झालेली ही घटना एका अपघाता संबंधित आहे. नेमके काय घडले आहे आणि कोणा सोबत ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Road Argument Video: नागपूरच्या महाल परिसरात एका तरुणीने विरुद्ध दिशेने कार चालवली आणि वळणावर तिच्या कारला एक दुचाकीस्वार जोरात धडकला. या अपघातानंतर रस्त्यावरच दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून, या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नेमके घडले कधी आणि काय?

व्हायरल (Viral) होत असलेली ही घटना दिनांक ३ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. मात्र. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडिया जोरदार व्हायरल झाला. तरुणीने मात्र कारमधून उतरत त्या तरुणाची हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली. काही क्षणात बघा यांची एक गर्दी झाली. तरुणाची चूक नसताना या तरुणीने मात्र त्याच्यासोबत चांगलाच वाद घातला.

यामुळे अगोदरच गजबजल्याचे असलेल्या भागांमध्ये वाहतूक कोंडी झाली आणि लोकांची गर्दी झाली याची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्याचा निर्णय पोलीस कर्मचारीशी सुद्धा हुज्जत घातल्याचा व्हिडिओमध्ये दिसून येत आहे

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच तरुणीचे रक्ताचे नमुने घेतले. अमली पदार्थांचे सेवन केले असल्याची शंका असल्यानं नमुन्याच्या अहवालानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती कोतवाली पोलिसांनाकडून दिली जात आहे.

मात्र हा व्हिडिओ(Video) सध्या सोशल मीडिया जोरदार व्हायरल होत आहे. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. तरुणी वैदकीय अभ्यास क्रमाची विद्यार्थी असल्याचं सांगितलं जातं आहे..

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT