kolhapur Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

kolhapur Shocking Video: महिलेच्या अंगातून भूत काढण्यासाठी मांत्रिकाकडून अघोरी प्रकार; पंचगंगा घाटावर मध्यरात्री धक्कादायक घटना

kolhapur Video: कोल्हापुरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ज्यात कोल्हापुरमधील पंचगंगा घाटावर झपाटलेल्या बाईच्या अंगातून मांत्रिका करवी भूत काढण्यात येत असल्याचे एका व्हिडिओत दिसत आहे.

Tanvi Pol

Panchganga Ghat incident: कोल्हापूरच्या पंचगंगा नदी घाटावर घडलेली एक घटना सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. जिथे झपाटलेल्या असल्याच्या संशयावरून एका महिलेवर मध्यरात्री मांत्रिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. हा प्रकार इतका भीतीदायक होता की आजूबाजूचे लोकही थरारून गेले. संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेनं खळबळ उडाली आहे.

झपाटलेली महिला आणि मांत्रिकाचा थरारक प्रयोग

व्हायरल(Viral) होत असलेली ही घटना कोल्हापूर शहरालगत असलेल्या पंचगंगा घाटावर घडली आहे. रात्री उशिरा एक महिला, तिचे नातेवाईक आणि एक तथाकथित मांत्रिक घाटावर पोहोचले. महिला झपाटलेली असल्याचा दावा करत त्या मांत्रिकाने तिला जोरजोरात ओरडायला लावलं, तिच्या अंगावर फुंकी मारली, काही विचित्र क्रिया केल्या.

घाटावरील हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे. त्यानंतर तो त्यांनी सोशल मीडियावरही व्हायरल केला आहे आणि सध्या तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून त्यावर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

धक्कादायक प्रकार पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

कोल्हापुरमधील(kolhapur) सार्वजनिक ठिकाणी असा प्रकार पाहिल्यानंतर प्रत्येकजण घाबरुन गेलेला आहे मात्र त्यावर काहींनी संतापजन प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत.''लोक सध्या कोणत्या युगात वावरत आहेत तरी अशा गोष्टींवर कसा विश्वास बसतो ते समजत नाही'' असे एका यूजरने म्हटलं आहे तर ''पोलिसांनी सर्वांवर योग्य ती कारवाई करावी'' असे अनेकांनी म्हटलं आहे'' अशा संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तिलक वर्माची ICC Ranking मध्ये मोठी झेप; पाकिस्तानी फलंदाजाला टॉप ५ मधून बाहेर फेकलं

Maharashtra Live News Update: मंत्री कोकाटेंच्या राजीनामाची चर्चा नाही - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Oscar 2026: करण जोहरच्या 'होमबाउंड'चा ऑस्कर २०२६ मध्ये दबदबा; टॉप १५ चित्रपटांच्या यादीत एन्ट्री

Railway Update: वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार; रेल्वेने नियम बदलले

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार

SCROLL FOR NEXT