Cobra In Kitchen Ceiling SAAM DIGITAL
व्हायरल न्यूज

Viral Video: भयंकर! किचनच्या सिंलिगमध्ये आढळला भला मोठा किंग कोब्रा, जिगरबाज महिलेनं केली सुटका, Video व्हायरल

Viral Video: घरात साधी पाल किंवा झुरळ दिसलं तरी कित्येकांना प्रंचड घाम फुटतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cobra In Kitchen Ceiling

घरात साधी पाल किंवा झुरळ दिसलं तरी कित्येकांना प्रंचड घाम फुटतो. मग विचार करा जर तुमच्या घरात एखादा छोटासा कीटक नव्हे तर भलामोठा किंग कोबरा असेल तर. आपल्यापैकी अनेकांना हे वाचूनच भीती वाटली असेल ना ? साप हा असा सरपटणारा प्राणी आहे,जो कधीही कुठेही लपून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. अशातच सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या व्हिडीओत एक भलामोठा साप चक्क एका किचनच्या सिलिंगमध्ये जाऊन बसल्याचे तुम्ही पाहू शकता. विशेष म्हणजे हा साधासुधा साप नाही तर तो चक्क किंग कोब्रा आहे. एवढा भयंकर साप किचनच्या वर असलेल्या सिलिंगमध्ये गेलाच कसा असा प्रश्न प्रत्येकाला पडलाच असेल. परंतू हे खरं आहे. सिलिंगमध्ये लपून बसलेल्या किंग कोब्राची तरुणीने सुरक्षितरित्या सुटका केली आहे.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक तरुणी किचनवर उभी आहे. त्यानंतर ती किचनच्या सिंलिगमध्ये लपून बसलेल्या सापाला काढण्याचा प्रयत्न करत आहे. सापाला काढण्यासाठी ती एका लांब काठीचा वापर करत आहे. अथक प्रयत्न करुन ती सिंलिगमध्ये लपलेल्या सापाला काढण्यात यशस्वी होते. मग आपल्या हातात भल्यामोठ्या सापाला पकडून ती सुखरुप किचनवरुन खाली उतरते. विशेष म्हणजे या तरुणीच्या चेहऱ्यावर जरा सुद्धा भीती दिसत नाही. मात्र व्हिडीओ बघणाऱ्या नेटकऱ्यांना भीती नक्कीच वाटली असणार हे मात्र खरं.

व्हायरल व्हिडीओ हा @sunshinecoastsnakecatchers या इन्स्टांग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या आहेत. व्हिडीओ पोस्ट होताच जोरदार व्हायरल झाला आहे. सदर घटना ऑस्ट्रेलियातील आहे. अनेकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे. त्यात एका यूजरने लिहीलं आहे की,' ही तरुण आणि धाडसी आहे. व्हायरल व्हिडीओला लाखोच्या घरात व्हूज मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

Govt Officials Caught In Bar: शासन 'बार'च्या दारी ; बिअरबारमध्ये सरकारी काम, उपराजधानीतल्या कारभारावरुन हल्लाबोल

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT