King cobra and cat Fight viral snake video on social media  Saam TV
व्हायरल न्यूज

Cat vs Cobra Snake Fight: किंग कोब्रा आणि मांजराची जोरदार फाईट, वातावरण टाईट; कोण जिंकलं? पाहा VIDEO

Satish Daud

Cat vs Cobra Snake Fight Video: साप आणि मुंगूस यांच्यामधील लढाईचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. साप आणि मुंगुसाचे वैर सगळ्यांनाच माहिती आहे. साप कितीही मोठा असला तरी लहान आकाराचा मुंगूस त्याच्या चपळाईने सापाला ठार करतो. आता सोशल मीडियावर साप आणि मांजर यांच्यातील घमासान युद्धाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

घरातील उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेकजण मांजर पाळतात. मांजर उंदराला तर घरातून हाकलून लावते, पण याशिवाय घरात येणाऱ्या इतर विषारी प्राण्यांपासून सुद्धा सर्वांना सावध करते. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक विषारी साप घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. पण मांजराने या सापाची वाट अडवून धरली आहे.

मुंगुसाप्रमाणेच मांजर आणि साप देखील एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. एकदा मांजरीने साप पाहिला, की ती न घाबरता त्याचा सामना करते. याचाच प्रत्यय या व्हिडीओतून आला आहे. घरात घुसणाऱ्या सापाला एका मांजराने घायाळ करून सोडलं आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहू शकता. एक विषारी कोब्रा साप घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. या सापावर पाळीव मांजराची नजर पडते. साप घरात घुसत असल्याचं पाहून मांजर त्याचा रस्ता अडवते. क्षणार्धात दोघांमध्ये घमासान युद्ध सुरू होतं.

मांजराला पाहून साप (Snake) पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मांजर काही या सापाला सोडत नाही. साप पुढे जात असताना मांजर त्याची शेपूट खेचते. यावेळी साप सुद्धा मांजरावर हल्ला करतो. मात्र, त्याच्या हल्ल्यातून मांजर स्वत:चा बचाव करते आणि लगेच मागे हटते.

कोब्रा साप मांजराच्या (Cat) या हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मांजर त्याला शेवटपर्यंत सोडत नाही. ती आपल्या पंजाचे तीक्ष्ण नखे मारून सापाला जखमी करते.व्हायरल झालेला हा व्हिडीओ @simsim100 या YouTube वरून शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूजरने लिहिले की, आत्तापर्यंत आम्हाला असे वाटायचे की, सापाशी लढण्याची हिंमत फक्त मुंगूसात आहे, पण आता कळले आहे की मांजरही मुंगूसची आजी आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT