Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: चिमुकलीच्या डान्स व्हिडीओने 'मी हाय कोळी' गाण्यावर सोशल मीडियावर मचवली धूम, पाहा व्हायरल VIDEO

Viral Video: लहान मुलांचे अनेक व्हिडिओमध्ये ते आपली कला दाखवत आहेत आणि सर्वांनाच त्यांच्या टॅलेंटने आश्चर्यचकित करत आहेत. सध्या एका अशाच शाळेतील चिमुकलीचा डान्स व्हायरल होतोय.

Dhanshri Shintre

कोणतंही काम सोपं नसतं, पण इच्छाशक्ती प्रबळ असल्यास, कोणतंही कार्य सोपं होऊ शकतं. एक काळ होता, जेव्हा डान्स करणारी किंवा गाणं गाणारी लहान मुलं फार कमी दिसायची. परंतु, सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लहान मुलांचे असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतात. यामुळे त्यांच्या टॅलेंटला एक मोठं व्यासपीठ मिळालं आहे.

लहान मुलांचे अनेक व्हिडिओमध्ये ते आपली कला दाखवत आहेत आणि सर्वांनाच त्यांच्या टॅलेंटने आश्चर्यचकित करत आहेत. सध्या एका अशाच शाळेतील चिमुकलीचा डान्स व्हायरल होतोय. या चिमुकलीने आपल्या नृत्याच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं आहे. व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रगल्भ नृत्यकौशल्यानं एक से एक स्टेप्स करीत आहे, ज्यामुळे तिला अनेक लोकांनी पाहून तिचं कौतुक केलं आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अनेक लहान मुलं डान्स करताना दिसत आहेत. त्यात एक चिमूकली मुलगी जिने लाल रंगाची साडी परिधान करत कोळी लूक केला आहे. ही चिमूकली मी हाय कोळी... या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. चिमुकलीचा डान्स अतिशय सुंदर, साधा आणि अप्रतिम आहे. जो पाहून हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला आहे. या व्हिडीओला दीड लाखाहून अधिक मिळालेले आहेत.

तिच्या डान्समुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. तिच्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीने तिच्या टॅलेंटला एक नवा आयाम दिला आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून या चिमुकलीच्या टॅलेंटचं कौतुक नक्कीच कराल. या मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या कलेला एक नवा वळण दिलं आहे. ही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चिमूकलीचा हा डानस व्हायरल व्हिडीओ 'aagrikoli80' या इन्स्टाग्राम अकांऊटवर शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

'देऊळ बंद 2' फेम स्नेहल तरडे यांच्याविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन अन् शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं; महायुतीच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Jennifer Winget: १२ वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, आता सिंगापूरच्या उद्योगपतीसोबत दुसऱ्यांदा संसार थाटणार ही फेमस अभिनेत्री

Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT