Khan Sir Viral Video Saam tv
व्हायरल न्यूज

Khan Sir Viral Video: एक दोन नव्हे तर तब्बल १५००० विद्यार्थ्यांनी बांधल्या राख्या; खान सरांचा हात पाहून अवाक व्हाल

Khan Sir Rakshabandhan Viral Video: काल रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. भाऊ-बहिणीच्या नात्याचा हा खास क्षण असतो. नुकताच खान सरांचा रक्षाबंधनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात खान सरांना राखी बांधण्यात आली आहे.

Siddhi Hande

खान सर हे सोशल मीडियावर खूप जास्त प्रसिद्ध आहेत. फक्त शिक्षक नव्हे तर ते उत्तम युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर आहेत. ज्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकतेच रक्षाबंधन साजरे झाले. रक्षाबंधनाच्या दिवशी खान सरांना अनेकांनी राखी बांधल्या आहेत. एक, दोन नव्हे तर तब्बल १५ हजार विद्यार्थ्यांनी खान सरांना राख्या बांधल्या आहेत. याचाच व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम पटना येथील एका मेमोरियल हॉलमध्ये आयोजित केला होता. यावेळी हजारो विद्यार्थी आले होते. यामध्ये अनेकजण आपल्या कुटुंबापासून लांब रहत होते. ते आपल्या शिक्षकांना भेटायला आले होते. खान सरांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यासाठी हजारो विद्यार्थी आले होते.

विद्यार्थ्यांसोबत भावनिक रक्षाबंधन

खान सरांनी विद्यार्थ्यांकडून राखी बांधून घेतल्या. राखी बांधताना त्यांना अश्रू अनावर झाले ते खूप भावनिक झाले. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खान सरांनी या विद्यार्थ्यांसाठी खाण्यापिण्याचीदेखील सोय होती.त्यांनी विद्यार्थ्यांसाठी १५६ प्रकारच्या पदार्थांची सोय केली होती. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा आनंद घेतला. त्यांनी हजारो विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेतली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

खान सर काय बोलले?

PTI ने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये खान सर विद्यार्थ्यांशी बोलताना दिसत आहे. ते म्हणाले की, माझे सौभाग्य आहे की विद्यार्थ्यांनी मला राखी बांधली आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीचे रक्षण करायला हवे. हा भाऊ-बहि‍णींचा सण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

IAS Officer Transfer: मोठी बातमी! १६ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे झाली नियुक्ती?

Heavy Rain Alert : देशातील २२ राज्यांवर अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट काय? VIDEO

जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

Accident: थरारक अपघात! भरधाव बसची २ दुचाकींना धडक, चाकाखाली चिरडून ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT