Kathak Dance Video Saam TV
व्हायरल न्यूज

Kathak Dance Video: धावत्या दुचाकीवर मुलीनं केलं कथ्थक; स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल, VIDEO व्हायरल

Kathak Dance On Bike Viral Video: बाबा दुचाकी चालवणार म्हणजे पडण्याचं काही टेंशन नाही असा कॉन्फीडन्स या मुलीमध्ये दिसतोय.

Ruchika Jadhav

Dance Viral Video:

एखाद्या व्यक्तीकडे असलेली कला म्हणजे देवाने दिलेलं सुंदर गिफ्टच असतं. कला जोपासण्यासाठी आणि त्यात पारंगत होण्यासाठी सराव आणि रियाज महत्वाचा असतो. गोड गळा असलेल्या व्यक्ती बऱ्याचदा आपल्या कामात मग्न असतानाही गाणी गुणगुणतात. तर डान्सची आवड असलेल्या व्यक्तींची कला देखील काम करताना पाहायला मिळत असते. अशात धावत्या दुचाकीवर डान्स केल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का?

डान्स करण्यासाठी मोठी जागा लागते. मात्र एका लहान मुलीने चक्क दुचाकीवर डान्स केलाय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, समोर दुचाकीवर या मुलीचे बाबा बसलेत. बाबा दुचाकी चालवणार म्हणजे पडण्याचं काही टेंशन नाही असा कॉन्फीडन्स या मुलीमध्ये दिसतोय.

त्यामुळे मुलगी बिंधास्त दुचाकीवर कथ्थकच्या कही स्टेप्स करताना दिसतेय. कथ्थक करताना ती दुचाकीवर पूर्णता तिरपी झालीये. ही मुगली आता पडतेय की काय असं चित्र दिसत आहे. मात्र डान्स करताना देखील तिने आपली बॉडी बॅलेन्स केलीये. मुलीचा बॅलेन्स पाहून सारेच थक्क झालेत.

दुचाकीच्या मागे एक कार धावत आहे. या कारमध्ये बसलेल्या काही मुलांनी लहान मुलीचा डान्स त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलाय. @Mamidisettisrinu या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. त्यावर नेटकऱ्यांनी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. पाहा या मुलीकडे तिच्याकडे डान्सची प्रॅक्टीस करण्यासाठी वेळच नाही. तर आणखी एका युजरने लिहिलंय की, ही चिमुकली गेल्या जन्मी भरतनाट्यम डान्स करत असणार.

सोशल मीडियावर ३ दिवासंपूर्वीच व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. मात्र एवढ्या कमी वेळात हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय. नेटकऱ्यांनी व्हिडीओला मोठी पसंती दिली आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखोंच्या घरात लाईक्स आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT