Bike Fire Saam Tv
व्हायरल न्यूज

Bike Fire At Petrol Pump: पेट्रोल पंपावर बाईकने घेतला पेट, क्षणात आग भडकली; नागरिकांची पळापळा, VIDEO व्हायरल

Bike Fire Viral Video: कानपूरमध्ये एका पेट्रोल पंपावर अचानक एका दुचाकीला आग लागल्याची घटना घडली आहे. पेट्रोल पंपावर दुचाकीला अचानक आग लागल्याने आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bike Catches Fire On Petrol Pump:

कानपूरमध्ये एका पेट्रोल पंपावर अचानक एका दुचाकीला आग लागल्याची घटना घडली आहे. पेट्रोल पंपावर दुचाकीला अचानक आग लागल्याने आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral News In marathi)

नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संप केला होता. त्यामुळेच देशातील पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच पेट्रोल पंपावर खूप जास्त गर्दी होत आहे. याच गर्दीत एका दुचाकीला पेट्रोल पंपाच्या बाजूला आग लागली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत पेट्रोल पंपावर खूप जास्त प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आगे. याच गर्दीत एका दुचाकीला अचानक आग लागते. पेट्रोल पंपाच्या परिसरात ही आग लागल्याने आजूबाजूचे लोक घाबरल्याचे दिसत आहे. यावेळी प्रसंगावधान दाखवत आजूबाजूच्या लोकांनी आग लागलेल्या दुचाकीला पेट्रोल पंपाच्या बाहेर नेले. जेणेकरुन पेट्रोल पंपावर कोणताही अनर्थ घडू नये. कानपूरच्या दक्षिण भागातील एक पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे.

या घटनेत कोणालीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. उपस्थित लोकांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पेट्रोल पंपाच्या आजूबाजूच्या परिसरात काही प्रमाणात आग लागल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT