JCB Nagin Dance Saam Tv
व्हायरल न्यूज

JCB Nagin Dance: JCBचा नागीण डान्स; नादखुळा VIDEO जोरदार व्हायरल

Viral Video: हळद किंवा कोणताही एखादा समारंभ असल्यास या गाण्यावर अनेक जण ताल धरतात. आजवर माणसं या गाण्यावर नाचत होती. मात्र आता जेसीबी गाड्या देखील यावर नाचत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Ruchika Jadhav

Video:

नागीण कितीही विषारी असली तरी बॉलिवूडमध्ये यावर अनेक चित्रपट बनवण्यात आलेत. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा नगिणा हा चित्रपट सर्वांनीच पहिला असेल. यामधून नागीण गाणं आणि त्याची म्युजिक त्या काळापासून अजूनही चर्चेत आहे. हळद किंवा कोणताही एखादा समारंभ असल्यास या गाण्यावर अनेक जण ताल धरतात. आजवर माणसं या गाण्यावर नाचत होती. मात्र आता जेसीबी गाड्या देखील यावर नाचत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू. शकता की, एक व्यक्ती हातात एक काठी घेऊन उभा आहे आणि नागीणसाठी वाजवल्या जाणाऱ्या म्युजिक प्रमाणे तो अॅक्टिंग करत आहे. तसेच समोर वेगवेगळ्या प्रकारची जेसीबी वाहने उभी आहेत. यामध्ये बसलेल्या व्यक्ती देखील जेसीबी वाहनांना नागीणप्रमाणे डान्स केल्यासाखे ऑपरेट करत आहेत. या अतरंगी क्रिएटिव्हीटीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

तरुणाने समोर पांढऱ्या सिमेंटची एक गोणी देखील ठेवलीय. नगिणीवर अंगारा टाकल्याप्रमाने तो या जेसीबीवर सिमेंटची पावडर उधळत आहे. @jcb_nu_mathu95 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर अनेक हसण्याचे ईमोजी शेअर केलेत.

आतापर्यंत या व्हिडिओला 2.5 मिलियन व्यूव्ज आणि कमेंट आल्यात. सोशल मीडियावर नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ डोक्याला विचार करण्यास भाग पाडतात. तर काही व्हिडीओ खळखळवून हसवतात. तरुण मंडळी सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी कायम अतरंगीपना करतात.

कधी दुचाकीवर स्टंट, तर कधी धावत्या रेल्वेतून स्टंटबाजी करतात. असं करण्याच्या नादात अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र तरीही बरेच जण अशा पद्धतीचे जीवघेणे स्टंट करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉस्टेलमधील मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं, खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

Success Story: १.५ गुणांनी संधी हुकली, पण हार मानली नाही; पुढच्याच प्रयत्नात समर्थ राकलेंनी क्लास-१ अधिकारी होऊनच दाखवलं

Deepika Padukone: स्पिरिट, कल्किनंतर आता तिसऱ्या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT