Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Jalna News: शेतकऱ्याचा नादखुळा! पावसामुळे दुचाकी फसली , पठ्ठ्याने बैलगाडीतून काढली बाहेर| VIDEO

Jalna Farmer Viral Video: जालन्यातील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जालन्यात शेतात अडकलेल्या दुचाकीला बाहेर काढण्यासाठी थेट बैलगाडीची मदत घेतली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय शिंदे पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

जालन्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे नद्यांना पूर येत असून शेतात देखील पाणी साचत आहे. जाफराबाद तालुक्यातील कोळेगाव परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडला या पावसामुळे शेतात पाणी साचलं.या पाण्यात अनेकांची वाहने अडकल्याची आपण पाहिली आहेत. जालन्यातली एका शेतकऱ्याच्या शेतात दुचाकी शेतात फसली. शेतकऱ्याने चक्क बैलगाडीच्या मदतीने ही दुचाकी बाहेर काढली आहे.

शेतात दुचाकी फसल्याने नागेश नेवरे या शेतकऱ्याने थेट दुचाकीला बैलगाडीच्या मदतीने बाहेर काढले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. जाफराबाद तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे.यामुळेच शेतात पाणी साचलं. त्यामुळे चिखल झाला. या चिखलात दुचाकी फसली आहे. ही दुचाकी बाहेर काढण्यासाठी बळीराजाने एकदम भारी युक्ती लढवली आहेत. त्यांनी चक्क आपली बैलगाडी शेतात घेऊन जाऊन दुचाकी बाहेर काढली आहे.

जाफराबाद तालुक्यातील कोळेगाव येथील एका शेतकऱ्याचा मोटरसायकल बैलगाडीत टाकून बाहेर काढतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या शेतकऱ्यांनी आपली चिखलात फसलेली दुचाकी शेतातून बैलगाडीत टाकून बाहेर काढली आहे.शेतकऱ्यांनी खूप मेहनतीने ही दुचाकी बाहेर काढली आहे.

या शेतकऱ्याने आपली बैलगाडी चिखलातून तर बाहेर काढली. यानंतर त्याने थेट बैलगाडीच्या मागे आपली दुचाकी ठेवली आणि त्यावर बसून तो गेल्याचे दिसत आहे. शेतकऱ्याचा हा अनोखा जुगाड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या शेतकऱ्याचं मात्र सर्वत्र कौतुक होत आहे. शेतकऱ्याच्या मदतीला शेवटी त्याची बैलगाडीच कामाला आली. या बैलगाडीवर बाईक चढवली अन् थेट शेताबाहेर नेली. या शेतकऱ्याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंचे खासदार फुटणार का? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra News Live Update: मालवणात एलईडी मासेमारीविरोधात मच्छीमारांचा संताप; मत्स्य विभागावर धडक मोर्चा

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! लोकलच्या ताफ्यात येणार नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची ट्रेन; वाचा सविस्तर

NHAI Internship: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात इंटर्नशिपची संधी; स्टायपेंड मिळणार ₹२०,०००; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Explainer : बारामतीत काँग्रेसची पॉवरफुल खेळी; सुनेत्रा पवारांच्या विरोधात अर्ज माघार घेऊन काय मिळवलं?

SCROLL FOR NEXT