Viral Video  Saam tv
व्हायरल न्यूज

Shocking Video : भयंकर! भारतीय खेळाडूचा फॉर्म्युला २ रेसिंगमध्ये भीषण अपघात; कारचा अक्षरश: चक्काचूर, पाहा व्हिडिओ

Kush Maini Shocking Crash : फॉर्म्युला २ रेसिंगमध्ये भारतीय खेळाडूचा भीषण अपघात झाला. या शर्यतीत भारतीय खेळाडूच्या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

साम टिव्ही

मुंबई : भारतीय रेसर कुश मैनीचा रविवारी एक भयंकर अपघात झाला. कुशी मैनीने ५ व्या स्थानावरून शर्यत सुरुवात केली होती. फॉर्म्युला २ रेसिंग सुरु झाल्यानंतर काही वेळात त्याच्या कारचा अपघात झाला. या रेसिंगमध्ये अनेक खेळाडूंनी त्याची कारला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आलं नाही. या रेसिंगमधील भीषण अपघातात कुश मैनीची कार अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

भारतीय रेसर कुश मैनीच्या कारचे तुकडेच झाले. या भीषण अपघातात कुश मैनी स्वत:चा जीव वाचवण्याश यशस्वी झाला. तर या अपघातात मार्टी आणि गोएथे यांनाही कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. अपघातानंतर तिघे खूप घाबरले होते. अपघातानंतर चालकांना मेडिकल पथकाजवळ नेण्यात आलं. मेडिकल पथकाने कुश मैनी आणि अन्य चालकांनी स्थिती ठीक असल्याचं सांगितलं. कुश मैनी हा इनविक्टा रेसिंग पथकात फॉर्म्युला २ मध्ये ड्रायव्हिंग करतो.

कुशने पाचव्या स्थानावरून रेस केली सुरु

कुशने फॉर्म्युला २ रेसमधील दुसरं वर्ष आहे. तो फॉर्म्युला वनमध्ये सहभागी केव्हा होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. तो अल्पाइन ड्रायव्हर अॅकेडमीचा सदस्य आहे. फॉर्म्युला वनच्या पुढील सीझनमध्ये अल्पाइन टीमच्या राखीव चालकाच्या भूमिका निभावण्याची त्याची इच्छा आहे. इनविक्टा शर्यतीत मैनी पाचव्या स्थानावर पात्र झाला होता. शनिवारी स्प्रिंट रेसमध्ये पॉइंट्स गमावल्यानंतर भारतीय रेसरला कुशला सुधारणा आणायची होती. फॉर्म्युला २ मध्ये कुशचा अपघात झाल्यानंतर त्याची शर्यत अर्ध्यात संपली.

नेमकं काय झालं?

२३ वर्षीय भारतीय रेसर कुश मैनीच्या कारचं अचानक बंद झालं होतं. त्यानंतर त्याची कार दुसऱ्या कारला धडकली होती. मैनीच्या वडिलांनी सांगितलं की, 'कुश मैनीची तब्येत आता ठीक आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. त्याची कार धडकल्यानंतर त्याचे सर्व मेडिकल रिपोर्टमध्ये कोणतीही दुखापत आढळली नाही. फॉर्म्युला २ रेसमध्ये दुसऱ्या सीझनमध्ये भाग घेणारा मैनी ११ व्या स्थानावर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT