viral video instagram
व्हायरल न्यूज

Viral Video: भावा तुला सलाम! हात नाहीत.. पायाने काढलं भारत मातेचं चित्र! स्वातंत्र्यदिनी अनोखी मानवंदना

Independence Day Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका कलाकाराने पायांचा वापर करुन सुंदर चित्र काढलं आहे.

Ankush Dhavre

Painting By Using Legs: भारतात आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तर काही लोकं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन आपल्या देशाप्रती आदर व्यक्त करताना दिसून येत आहेत. एका युजरने स्वातंत्र्यदिनी अनोखी मानवंदना दिली आहे.

व्हिडिओ तुफान व्हायरल

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी असंख्य व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र हा व्हिडिओ जरा स्पेशल आहे. या व्हिडिओत सादर केलेली कला पाहून नक्कीच तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. भल्याभल्यांना हातांचा वापर करुनही चित्र काढता येत नाही. मात्र या पठ्ठ्याने पायांचा वापर करुन एक सुंदर चित्र काढलं आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पायांचा वापर करुन काढलं चित्र

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा धीरज सातविलकर या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, धीरज आपल्या आईला हाक मारतो आणि विचारतो, रांगोळी काढू की चित्र काढू? यावर उत्तर देत त्याची आई म्हणते, एक चांगलं चित्र काढ.

मग काय, धीरज पेन्सिल आपल्या पायांच्या बोटात धरतो आणि चित्र काढायला सुरुवात करतो. त्याने पायांच्या साहाय्याने भारत माता आणि मागे देशाचा नकाशा असं चित्र काढतो. त्यानंतर ते रंगवतो.हे सुंदर चित्र पाहून नेटकरी त्याचं कौतुक करताना दिसून येत आहेत. यासह भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT