A man fell in the waters while making reels saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: नजर हटी दुर्घटना घटी! बोटीवर चालता चालता तरुणाचा गेला तोल अन्...पाहा पुढे नेमकं काय घडलं

Viral funny video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा बोटीवरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नक्की काय घडलं? तुम्हीही व्हिडिओ पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियाच्या काळात कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल हे काय सांगता येत नाही. काही जण रिल्स बनवून स्वतः मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असतात. तर कधी कधी न कळता कोणाचाही व्हिडिओ कॅमेरात कैद होतो आणि तो व्हायरल होतो. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतच असतात.

काही वेळेस हे व्हिडिओ गमतीदार असतात तर काही वेळेस भीतीदायक असतात. आता असाच एक गमतीदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण रिल्स बनवण्याच्या नादात थेट पाण्यात पडला. हा गमतीदार व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण बोटीवर रिल्स काढायच्या नादात थेट पाण्यात जाऊन पडला. तो रिल्स काढण्यासाठी बोटीवर चढला होता. त्याचा एक मित्र बोटीच्या लांबून त्याचा व्हिडिओ काढत होता. यावेळी तो बोटीवर मागे पाहून चालत होता. तो पुढे न पाहता कॅमेऱ्यात बघून अॅक्टिंग करायला जातच होता. तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि पाण्यात पडला. या व्हिडिओला हजारोंच्या संख्येत लाईक्स मिळाले आहेत. तर २५ हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला शेअर केला आहे.

हा व्हिडिओ रांची एक्सप्लोरस या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओला 'इसकी कसती ही वहां डूबी जहां पानी कम था' असा कॅप्शन दिला यावेळी नेटकऱ्यांनी या तरुणाची खिल्ली उडवली आहे. तसेच गमतीदार कमेंटसचा वर्षाव केला आहे. एका युजर्स ने लिहिले कि, 'नजर हटी दुर्घटना घटी' तर दुसऱ्या युजर्सने लिहिले कि 'रिल्स बन गई कि नही'. अशी वेगवेगळी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली.

Edited by: Priyanka Mundinkeri

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

SCROLL FOR NEXT