Hyderabad Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: लेकीला पार्किंगमध्ये झोपवून आई कामासाठी गेली अन् विपरित घडलं; गाढ झोपेत असतानाच SUV थेट... पाहा VIDEO

Hyderabad Parking Accident Viral Video: वाढत्या उन्हामुळे तीन वर्षाच्या चिमुकलीला आईने पार्किंगमध्ये झोपवलं होते... पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Gangappa Pujari

Hyderaband Accident: हैदराबादमध्ये एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये झोपलेल्या एका 3 वर्षीय मुलीचा एसयूव्हीने चिरडून मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. शहरातील हयातनगर परिसरात हा भीषण अपघात घडला. ही संपूर्ण घटना इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहेत. त्यामुळे उन्हापासून वाचण्यासाठी प्रत्येकजण निवारा शोधत आहे. असाच निवारा एका चिमुकलीच्या जिवावर बेतला आहे. ज्यामध्ये पार्किंगमध्ये झोपलेली असताना SUV अंगावरुन गेल्याने तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या भयंकर घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हैद्राबादच्या हयातनगर येथील टीचर्स कॉलनी येथील अपार्टमेंट इमारतीत बुधवारी हा अपघात घडला. याबाबत  22 वर्षीय महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कविता असं या महिलेचं नाव असून कर्नाटकच्या गुलबर्गा येथील शाबाद मंडलची रहिवासी आहे.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, कामाच्या शोधात ती मुलांना घेऊन हैदराबादमध्ये आली होती. बुधवारी हयातनगर येथील लेक्चर्स कॉलनीमध्ये एका निर्माणधीन इमारतीत काम करण्यासाठी ती पोहोचली. यावेळी ऊन सहन होत नसल्याने चिमुकली मुलगी जवळच असणाऱ्या बालाजी आर्केड अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये झोपायला गेली.

यादरम्यान, इमारतीत पार्किंगसाठी आलेली एसयुव्ही अंगावरुन गेल्याने चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. ही सर्व घटना इमारतीच्या सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. 

या प्रकरणात कार चालकावर गुन्हा दाखल झाला असून कार चालवत असलेल्या हरी राम कृष्णाला मुलगी न दिसल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच संबंधित कार चालक इंटिरियर डिझायनर असून त्याची पत्नी दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक म्हणून काम करत असल्याचेही समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसची 'वंचित'ला निवडणुकीसाठी साद; प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? VIDEO

भारतातही 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी? कारण काय? VIDEO

Saturday Horoscope : येत्या काही दिवसांत मोठं काही तरी घडणार; 5 राशींच्या लोकांचे आयुष्य आनंदाने फुलून जाणार

Pune Politics : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती फिस्कटली? पुण्यात नेमकं काय घडलं?

Syria Masjid Blast : मशिदीत नमाजावेळी बॉम्बस्फोट; 12 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT