Couple Dance Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Couple Dance Video: कमालच! दादा कोंडकेच्या गाण्यावर नवरा-बायकोचा डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Viral Dance Video: सोशल मीडियावर सध्या एका मराठी जोडप्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एक डान्सचा आहे. तुम्हीही एकदा हा व्हायरल झालेला डान्स व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

दादा कोंडके हे नाव जरी ऐकले तरी, प्रत्येक मराठी रसिकाच्या डोळ्यासमोर त्यांच्या हटके आणि धमाल गाण्यांच्या आठवणी निर्माण होतात. त्याच धर्तीवर सध्या सोशल मीडियावर एक धमाकेदार व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरा-बायकोची जोडी दादा कोंडकेच्या मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. त्यांच्या डान्सने सोशल मीडिया युजर्सचे भरभरून मनोरंजन केलं आहे.

हा व्हायरल(Viral) व्हिडिओ कोणत्या कार्यक्रमातील आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नसून, तो कोणीतरी पाहुण्यांच्या समोर शूट केला आहे. पारंपरिक वेशात सजलेला व्यक्ती आणि छान साडी नेसलेली बायको, दोघंही अगदी उत्साहात डान्स करत आहेत. गाण्याचे बोल आणि त्यावरचं त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हे सगळंच पाहण्यासारखं आहे. दोघांची ट्युनिंग इतकी जबरदस्त आहे की, प्रेक्षक टाळ्यांनी दाद देताना थकत नाहीत.

डान्स व्हिडिओ सध्या rahulkumarrathod या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. पाच दिवसांपूर्वी अपलोड झालेल्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत तर नेटकऱ्यांनी लाखोंचे व्ह्यूजही व्हिडिओला मिळवून दिलेले आहेत.

हा व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोक त्यावर मजेशीर कमेंट करत आहेत. "ही जोडी म्हणजे लाईव्ह एन्टरटेनमेंट आहे," अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिलेल्या आहेत. .मराठी गाण्यांची मजा आणि नवरा-बायकोची धमाल केमिस्ट्री, या व्हिडिओमुळे इंटरनेटवर एक वेगळीच रंगत पाहायला मिळतेय, असे एका यूजरने म्हटलं आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगरनंतर आता नांदेडमध्ये गॅसचा तुटवडा

Blood Pressure : झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवण कराच, BP अन् आणि शुगर राहील कंट्रोलमध्ये; नव्या संशोधनातून महत्त्वाची माहिती

America: 'भारतीय चांगले अ‍ॅक्टर', रशियन तेल खरेदीवरून अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरींचं विधान

Viral Video: धक्कादायक अपघात कॅमेऱ्यात कैद! समोरून येणाऱ्या दोन बाईकस्वारांची एकमेकांना धडक, काळजाचा ठोका चुकवणारा Video

Kalyan Murbad : कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट, रेल्वे मंत्र्यांनी सांगितला सर्वात मोठा अडथळा

SCROLL FOR NEXT