Tauba Tauba Dance Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Tauba Tauba Dance Viral Video : जाळ अन धूर संगटच! 'तौबा तौबा' गाण्यावर महिला बेभान होऊन नाचली, पाहा भन्नाट VIDEO

Tauba Tauba Dance Video Viral : गाणं सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून आजवर अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी व्हिडिओ बनवले आहेत. यातीलच एक अत्यंत फनी व्हिडिओ सध्या व्हायरल आणि ट्रोल झाला आहे.

Ruchika Jadhav

गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटातील ‘तौबा तौबा’ गाण्याने साऱ्यांनाच वेड लावलं आहे. चाहत्यांना तोबा तोबा गाण्याची भूरळ पडली असून सर्वजण या गाण्यावर रील्स बनवताना दिसतायत. गाणं सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून आजवर अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी व्हिडिओ बनवले आहेत. यातीलच एक अत्यंत फनी व्हिडिओ सध्या व्हायरल आणि ट्रोल झाला आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोण काय करेल याचा खरोखर काही नेम नाही. व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीही करू शकतात. काही जण सोशल मीडियावर जीवघेणे स्टंट करताना दिसतता. तर काही जोडपी बेभान होऊन मेट्रो ट्रेनमध्ये रोमान्स करत असतात. अशात तोबा तोबा या गाण्यावर सुद्धा एका महिलेने विचित्र पद्धतीने डान्स केला आहे.

व्हिडिओमध्ये तु्म्ही पाहू शकता की, या महिलेने गोल साडी नेसली आहे. साडी नेसून तिने नाचण्यासाठी आपला पदर कमरेवर खोचला आहे. तसेच तोबा तोबा गाण्यावर तिने डान्स सुरू केला आहे. यामध्ये महिला घरातल्या घरात डान्स करताना धावण्याची स्टेप करत असल्याचं दिसतंय. तिच्या स्टेप्स पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत. या महिलेने तृप्ती डिमरीला सुद्धा मागे पाडलं, असं काही नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

फुल एनर्जीमध्ये डान्स करणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ @lucky.divyanshuhttpsyoutube.co या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १.१ मिलियन व्हुव्ज मिळालेत. जर विकी कौशलने आत्महत्या केली तर त्याला ही महिला जबाबदार असेल, असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. महिला फारच खतरनाक आहे, थेट हल्ला करते, अशा अनेक हस्स्यास्पद कमेंट सुद्धा या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Varsha Usgaonkar: वर्षा उसगांवकरांचा जन्मभूमीवर खास बहुमान; गोवा राज्य चित्रपट महोत्सवात 'या' पुरस्काराने सन्मानित

Screen time effects on kids: वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय चिडचिडेपणाची समस्या; कसं कराल स्क्रीन टाईम मॅनेजमेंट?

Maharaja Palace History: शाही घराण्याचा गौरव, सांस्कृतिक वारसा असलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक पॅलेसची माहिती

अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलली, मुंबईत पावसाचं रौद्ररूप, IMD कडून रेड अलर्ट, शाळाही बंद

SCROLL FOR NEXT