Horse and Ferrari Car Video Saam TV
व्हायरल न्यूज

Horse and Ferrari Car Video: घोड्याचा राजेशाही थाट; चक्क महागड्या फरारी कारमध्ये दिलं जेवण, व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL

Viral Video: द करा पण आमचा कुठं...! महागड्या फररी कारमध्ये घोड्याला जेवण; व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL

Ruchika Jadhav

Horse Eating Food in Ferrari car: फरारी कार तुम्हा सर्वांना माहितीच असेल. दिसायला एकदम आकर्षक आणि अनेकांची ही ड्रीम कार आहे. मात्र या कारची किंमत सर्वसामान्य माणसांच्या खिशाला न परवडणारी आहे. त्यामुळे अनेक जण फक्त या कारचा फोटो पाहूनच आपल्या मनाची समजूत घालतात. अशात ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे अशा व्यक्ती काय करतील आणि काय नाही याचा काही नेम नाही. (Latest Horse News)

सध्या सोशल मीडियावर एका फरारी कारचा (Ferrari Car) व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फरारी कार ऐवजी एका घोड्याची भन्नाट चर्चा रंगली आहे. कारण एका व्यक्तीने आपल्या फरारी कारमध्ये चक्क घोड्याला जेवण दिलं आहे. फरारीच्या बोनेटवर या व्यक्तीने घोड्यासाठी गवत आणून टाकलं आहे.

व्हिडिओमध्ये घोडा फरारीमध्ये ठेवलेलं गवत खाताना दिसतोय. लाल रंगाच्या चकचकीत फरारी कारमध्ये गवत ठेवलं आहे आणि घोडा (Horse) हे गवत घातानाचं दृश्य त्या व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

@philipirelandsupercars या इंस्ट्राग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळालेत. तसेच नेटकऱ्यांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्यात. यात एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, महागड्या कारचा असा वापर करायचा असेल तर त्या विकत घेऊनये. तर अन्य काही फरारी प्रेमींनी देखील या कार मालकावर टीका केलीये.

सोशल मीडियावर प्राण्यांचे असे अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. या आधी देखील घोड्याचा आणखी एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये घोडा आणि कारचा अपघात झाल्याचं दिसत होतं. घोड्याचे पाय कारची काच तोडून आतमध्ये आडकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : बसची जोरदार धडक, प्रवासी वृद्धाचा मृत्यू; यवतमाळच्या दारव्हा बसस्थानक आवारातील घटना

Pimple Warning : मुरुम काढण्याच्या निष्काळजीपणाने थेट मेंदूला धोका, या सामान्य समस्येला दुर्लक्षित करु नका

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण आंदोलनानंतर शेतकरी कर्जमाफीचं आंदोलनही मुंबई धडकणार

पुणे - नाशिक प्रवास होणार जलद; २ तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर, कुठून कसा असणार एलिव्हेटेड मार्ग?

Vande Bharat: नांदेड- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून सुरू, थांबा- तिकीट अन् वेळापत्रक काय? वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT