Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: भयंकर अपघात! भरधाव टेम्पो ट्रॅव्हल्सने एकापाठोपाठ ३ जणांना उडवलं; घटना सीसीटीव्हीत कैद

Accident Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजणाच्या अंगाचा थरकाप उडाला आहे. अपघात नेमका कसा घडला ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

CCtv Viral Video: शहरातील एका गजबजलेल्या मार्गावर एक भीषण अपघात घटना घडली आहे. ज्यात ३ जणांचा जागीत मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एक टेम्पो ट्रॅव्हल्सने सायकल, पोलीस जीप आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

व्हायरल (VIRAL) होत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये तुम्हाला, रस्त्याच्या कडेने एक सायकलवरुन एक व्यक्ती जाताना दिसत आहे आणि एक व्यक्ती शिवाय त्या व्यक्ती सोबत एक महिला आहे. कोणालाही पुढे काय होणार याची जराही कल्पना नसते. काही वेळात रस्त्यावरुन एक टेम्पो ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने जातं असते. हीच टेम्पो ट्रॅव्हल्स जात असताना अचानकपणे रस्त्याच्या कडेतून जाणाऱ्या सायकल स्वार, एक कपल आणि पोलिस जीपला धडक मारते.

या अपघातात(Accident) तीन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात गोंधळाचे वातावरण पसरले होते. ही घटना नेमकी कोणत्या शहारातील आहे ते अद्याप समजलेले नाही मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे आणि तो आता इन्स्टाग्रामवरील vadalwara या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

घटना इतकी भयंकर आहे की, त्यावर नेटकरी वर्गातून विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''म्हणून फुटपाथवर चालावे, फुटपाथ हा चालन्या साठी असतो आणि रस्ता वाहनासाठी'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''फुटपाथ रिकामा पडलाय आणि लोकांना, पार्क केलेल्या गाड्यांच्या पलीकडून रस्त्यावरून चालायचं आहे'' तर काहींनी वाहन चालकांची संपूर्ण चूक दर्शवली आहे, अशा प्रकारे अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT