Viral Video Honey Testing Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video Honey Testing: शुद्ध मध तपासण्यासाठी रामबाण उपाय; पठ्ठ्यानं थेट २०० रुपयांची नोटच पेटवली, पुढे काय झालं?

Honey Purity Check On 200 rs Note: मधाची शुद्धता कशी तापासावी हा मोठा प्रश्न बऱ्याच व्यक्तींसमोर उभा राहतो.

Ruchika Jadhav

Viral Video: मध खायला सर्वांनाच आवडतं. मधमाश्यांच्या पोळ्यातून मिघणारं मध प्रचंड गोड असतं. अनेक प्रकारच्या आजारांवर देखील मध गुणकारी ठरतं. त्यामुळे जास्तीचे पैसे देऊन देखील व्यक्ती शुद्ध मध विकत घेणे पसंत करतात. बाजारात अनेक ठिकाणी मधाची विक्री केली जाते. या सर्वांत मधाची शुद्धता कशी तापासावी हा मोठा प्रश्न बऱ्याच व्यक्तींसमोर उभा राहतो. (Latest Marathi News)

मेडीकलमध्येही शुद्ध मधाचा दावा करत त्याची विक्री केली जाते. तर रस्त्यावर आणि दारोदारी काही व्यक्ती मध टोपलीत भरुन विकताना दिसतात. गावरान आणि शुद्ध मध कसं ओळखायचं असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर एका आजोबांनी लढवलेली शक्कल नक्की पाहा.

सोशल मीडियावर मधाची शुद्धता पटवून देणारा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एक वृद्ध व्यक्ती मध विकत आहे. नागरिकांना या मधाची शुद्धता पटवून देता यावी यासाठी त्यांनी गावठी रामबाण उपाय शोधलाय.

२०० रुपयांच्या नोटेवर लावली आग

नोटेची शुद्धता पटवून देताना या व्हिडिओमध्ये (Video) दिसत आहे की, मध विकणाऱ्या व्यक्तीने हातात एक कडक २०० रुपयांची नोट घेतली आहे. या नोटेवर त्यांनी मध घेतले. मध नोटेवर थोडं पसरवलं. त्यानंतर त्यांनी या नोटेला आग लावली आहे. नोटेला आग लागल्यानंतर देखील नोट जळत नाही. कारण त्यावर मध असतं. या मधामुळे नोट जळत नाही. आहे तशीच राहते.

सोशल मीडियावर (Social Media) या नोटेचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल झाला आहे. 'इंडियन फूडी' या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सदर व्हिडिओ कोलकत्ता येथील असल्याचं म्हटलं जातय.

आतापर्यंत या व्हिडिओला ८ लाखांहून अधिक व्हूव्ज आलेत. तर १३ हजारांहून अधिक कमेंट्स यावर आल्या आहेत. काहींनी हा व्हिडिओ फेक असल्याचं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांना मधाची शुद्धता तपासण्याची ही ट्रीक फार आवडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT