Landslide Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Landslide Viral Video: हिमाचलमध्ये निसर्गाचा कहर, मणिकर्णात डोंगरातून कोसळली दरड, भूस्खलनाचा थरारक व्हिडीओ

Himachal Pradesh Manikaran Landslide Video: हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील मणिकर्ण येथे जोरदार पावसामुळे भूस्खलन झाले. डोंगरावरून दगडी पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Manasvi Choudhary

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. ढगफुटी, भूस्खलन आणि पूर परिस्थिती यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते, पूल आणि रेल्वे देखील बंद करण्यात आले आहेत. अनेक डोंगराळ भागात दरडी कोसळल्या आहेत. सोशल मीडियावर देखील याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मणिकर्णामध्ये भयावह परिस्थीती झाली आहे. मणिकर्ण घाटात डोंगरातून भूस्खलन होण्याची परिस्थिती निर्माण झाली. अचानक डोंगराळ भागातून मोठमोठ्या दगडी पडल्या आहेत. सोशल मीडियावर भूस्खलनाचा भयानक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये डोंगरावरून दगडी पडल्याने आजूबाजूंच्या परिसरात भितीदायक परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

मागील अनेक दिवसांपासून हिमाचलप्रदेशमध्ये पावसाने जोर धरला आहे. कुल्लू आणि मंडी या प्रसिद्ध शहरांचे नुकसान झाले आहेत. कुल्लूच्या मणिकर्ण येथे यात्रेकरू भेट देत असतात. यामुळेच सध्या होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रशासनाने यात्रेकरू व स्थानिकांना खबरदारीचे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यासाठी दुपारी 4 वाजेपर्यंत रेड अलर्ट

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १० तोळा सोनं ५००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचे लेटेस्ट 5 डिझाईन्स, साडीवर दिसतील भारी

बस चालकाच्या घरात सापडलं घबाड; १५ किलो सोन्याचे बिस्किट्स, पैशांनी भरलेली ३५ पोती; नोटा मोजताना बंद पडल्या ५ मशीन्स

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोर्टाचा समन्स, १७ वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं काय आहे?

SCROLL FOR NEXT