Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दुर्दैवी घटना! घरासमोर पावसात खेळणाऱ्या चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यू; हृदयद्रावक व्हिडिओ आला समोर

Shocking Viral Video: सोशल मीडियावर वारंवार अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येकजण भावूक झालेला आहे. व्हिडिओ नेमके काय घडते ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Tragic Incident Video: पावसाळा म्हणजे प्रत्येकासाठी आनंदाचा हंगाम. लहान मुलांसाठी तर तो खास आकर्षण असतो. घरासमोर साचलेलं पाणी आणि त्यात सोडलेली कागदी होडी या सगळ्या गोष्टी लहानग्यांना अपार आनंद देतात. मात्र, कधी कधी हा आनंद दु:खद ठरतो. अशीच एक हृदयद्रावक घटना नुकतीच घडली असून तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दुर्दैवी घटना सीसीटीव्हीत कैद

व्हायरल (VIRAL)होत असलेल्या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतं की, लहान मुलं आनंदाने पावसात खेळत आहेत. एकमेकांवर पाणी फेकत आहेत, हसत आहेत. काही वेळाने अचानक एक चिमुकला खेळता खेळता खड्ड्यात पडतो. क्षणात त्याचा पत्ता लागत नाही. मात्र चिमुकला खड्ड्यात पडल्यानंतर अन्य मुलांनी किंचाळण्यास सुरुवात केली. धक्कादाय म्हणजे चिमुकली बाहेर खेळत असताना कोणतीही मोठी व्यक्ती त्यांच्या सोबत नाही.

या घटनेचा संपूर्ण थरारक प्रसंग घराजवळ असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला आहे. काही दिवसात ही घटना वाऱ्याच्या वेगाने देशभर व्हायरल झाली आणि सध्या हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील vaishnodevi_maa_2000 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे ते अद्याप समजलेले नाही.

स्थानिक नागरिकांनी यानंतर जोरदार संताप व्यक्त केला आहे. काहींनी व्हिडिओ(VIDEO) पाहून म्हटलं की,''पालंकाचे लक्ष कुठे होते'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''संपूर्ण पालकांची चुकी आहे यामध्ये'' तिसऱ्या यूजरने म्हटलं,''कधीही काही होऊ शकतं'' अशा भावूनकही प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांच्या चालकाला शिवीगाळ अन् मारहाण; पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा

Maharashtra News Live Update: अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई

Latest Alta Design For Feet: पायांचे सौंदर्य खुलवण्यासाठी ट्राय करा अल्ताचे हे ७ लेटेस्ट डिझाइन्स

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तिहेरी अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Mumabi Tourism : गर्दी नाही, गोंधळ नाही; 'येथे' लपलाय अथांग समुद्रकिनारा, जणू मुंबईतला स्वर्गच

SCROLL FOR NEXT