Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अगं बाई! 'साजन जी घर आये' गाण्यावर चिमुकलीने धरला ठेका; मात्र पुढे जे झाले ते पाहून नेटकरी म्हणाले....

Dance Viral Video: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी घरातील सदस्यांचा एकत्रित डान्स असतो तर कधी नवरा-बायकोचा, मात्र सध्या एका चिमुकलीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे परंतू त्यात काय असे खास आहे ते तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Girls Dance Video: सध्या सर्वत्र लग्नसराईची धुम सुरु झालेली आहे. दरदिवशी अनेक लग्नाचे कार्यक्रम पाहण्यास मिळत असतात. सोशल मीडियावरही लग्नकार्यातील व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यात कधी वधु-वरांचा डान्स असतो तर कधी वऱ्हाडी मंडळीचा डान्स. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ती घराच्या छतावर एकटी डान्स करत असते मात्र पुढे असे काही होते ती तेथून पळ काढते.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक लहान मुलगी घराच्या टेरेसवर असून ती एकटी डान्स करत आहे. मात्र टेरेसवर तुम्ही पाहिले तर कोणतीही मुझिक सिस्टिम लावलेली नाही मात्र दुसऱ्या एका घरात डीजे लावलेला असतो, त्या आवाजावर ती चिमुकली डान्स करत आहे. मात्र तिचा सर्व डान्स दुसरीकडून एक व्यक्ती कॅमेऱ्याक कैद करत आहे. ती डान्स(Dance) करताना पूर्ण पणे तिच्या नादात आहे तिला कोणी आपल्याकडे पाहत आहे हे कळलेले नाही, परंतू काही वेळात तिची नजर व्हिडिओ शूट करत असलेल्या व्यक्तीकडे जाते आणि ती लाजून तेथून पळ काढते.

चिमुकलीचा डान्स व्हिडिओ ''इन्स्टाग्राम'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टाग्रामवरील'' the_ultimate_trolls_'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच तब्बल ३० हजार नेटकऱ्यांनी चिमुकच्या डान्सला पसंती दिलेली असून मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रतिक्रिया नेटकरी वर्गातून आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''वा'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'' मस्तच गं'' तर अनेक यूजर्संनी लिहिले आहे की,''डान्स अतिशय उत्तम आहे'',अशा प्रकारे अनेकांनी कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Tourist Spots: मुंबई-पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' बेस्ट वीकेंड डेस्टिनेशनला द्या भेट

Maharashtra Live News Update: मुंबईच्या अंधेरी MIDC परिसरात सीप्ज कंपनीला भीषण आग

Oracle Layoff: कामावर येऊ नका; एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं | VIDEO

Toll Price Hike: प्रवास महागला! महाराष्ट्रातील टोलच्या दरात मोठी वाढ, आता किती पैसे मोजावे लागतील ?

एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, शिवसेनेत वेगवान हालचाली; श्रीकांत शिंदेंसह ३९ नेत्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT