Sangli Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Sangli Video: सांगलीमध्ये गुंडाची दादागिरी, हॉटेलमध्ये राडा घातला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Sangli Gangster Hotel Fight: सोशल मीडियावर सध्या एका धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जी सांगली शहरातील असल्याचे समजते. मात्र, या घटनेत नेमके काय घडले ते एकदा व्हिडिओमध्ये पाहा.

Tanvi Pol

Sangli Viral Video: सांगलीच्या कॉलेज कॉर्नर परिसरात एका हॉटेलमध्ये गुंडाकडून सोमवारी रात्री धुडगुस घातला. हत्यारे नाचवत गुंडानी दहशत माजविली. हॉटेलमधील वेटर, कर्मचार्‍यांना शस्त्रांचा धाक दाखविला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती. संशयित गुंड संजयनगर परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र संशयिताचे नावे पोलिसांनी शोधली असून त्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कॉलेज कॉर्नर येथील अक्षरम हॉटेलमध्ये(Hotel) रात्री गुंड शिरले. त्यांनी बसण्यास जागा देण्यास सांगितले. पण, आतमध्ये जागा नसल्याने वेटरने हॉलमध्ये बसण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने गुंडांनी आम्ही कोण हे ओळखत नाहीस, त्यामुळे असे बोलतोस असे म्हणत धक्का दिला.

त्यानंतर दारू आणि पाण्याची बाटली मागितली. पाण्याच्या बाटलीवरून गुंडांनी पुन्हा वेटरशी वाद घातला. त्यानंतर संशयितांनी हत्यार काढून हॉटेलचे नुकसान करण्यास सुरवात केली. वेटरने लोखंडी शटर बंद करण्याचा प्रयत्न केला असता ते शटर त्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर धारदार शस्त्रे नाचवत धुडगुस घातला.

हॉटेलचे काऊंटर, फ्रिज, भिंती, टेबलावर शस्त्राने वार करून नुकसान केले. त्यानंतर ते चारचाकीतून निघून गेले. हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याचे चित्रीकरण सोशल मिडीयावर व्हायरल (Viral)झाले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयिताचे नावे निष्पन्न केले आहेत. त्यांना लवकरच ताब्यात घेतल्या जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टीप: सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT