Dance Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: अगं बाय..! नातवाच्या लग्नात आजीचा खतरनाक डान्स; तरूण वऱ्हाडीही लाजतील अशा स्टेप्स

Dance Viral Video: कार्यक्रमात नवरा-नवरीसोबतच सर्वजण भन्नाट डान्स करतात. लग्नातील डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Grandma Dance In Grandchild Wedding

लग्नसोहळा असू देत किंवा हळदीचा कार्यक्रम डान्सशिवाय सर्व कार्यक्रम अपुराच असतो. अशा कार्यक्रमात नवरा-नवरीसोबतच सर्वजण भन्नाट डान्स करतात. लग्नातील डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

असाच एका लग्नातील वरातीतील आजीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या आजीने जो काही डान्स केला आहे त्याने तरुणांना देखील लाजवलं आहे. सध्या सोशल मीडियावर या आजीचीच्या डान्सची जोरदार चर्चा होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्न सराईच्या दिवसात काम करुन चांगल्या चांगल्या व्यक्तीची नाकीनऊ येते. परंतू या आजींचा उत्साह भल्या भल्याना लाजवेलं असा आहे. आजी आणि नातवाचं नातं कायमच सगळ्या नात्यांपेक्षा निराळ असतं. आजी ही सर्वांच्या आयुष्यातील हक्काची व्यक्ती असते. याचं आजीने वयाचे भान विसरुण आपल्या नातवाच्या लग्नतील वरातीत भन्नाट डान्स केला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका रस्त्यावरुन लग्नाची वरात जात आहे. याच वरातीत अनेक महिला तसेच तरुणही बँडबाजाच्या तालावर डान्स करत आहेत. दरम्यान आजीमध्ये येतात अन् धमाकेदार डान्स करायला लागतात. आजीने निळ्या रंगांची साडी परिधान केलीय. आजी अशी काही नाचली आहेत की तिच्यासोबत नाचणाऱ्या महिलांना सुद्धा असा उत्साह आणता येईना. आजीच्या या डान्सपुढे इतर वऱ्हाडी फिके पडले आहेत.

आजीचा हा डान्स पाहून त्यांना नाचण्याची आवड असल्याचे दिसून येत आहे. या वयातील आजीचा हा जबरदस्त डान्स पाहून नृत्याला वयाची मर्यादा नसते हे आजीने सिद्ध करुन दाखवले असे म्हणायला हरकत नाही. आजीचा हा डान्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आजीचा डान्सचा व्हिडिओ एक्स (ट्वीटर)अॅपवरील @ChapraZila या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की,'नातवाच्या लग्नाचा आनंद आजीच्या डान्समधून दिसत आहे'.इतक्या वयात आजीचा हा डान्स पाहून अनेक जण तिचे कौतुक करत आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंटस् येत आहेत. एका यूजरने कमेंट केली आहे की,' मस्त आजी'. व्हायरल व्हीडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळत असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Mhada Home: म्हाडाचे घर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत | VIDEO

ST Bus : पुणे-मुंबई प्रवास महागला, एसटीच्या तिकिटात वाढ, पाहा कोणत्या शहराला जायला किती तिकिट? |VIDEO

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

SCROLL FOR NEXT