Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: हा हा हा...आजीने रागावून दिलेले उत्तर व्हायरल, VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

Viral Video: सध्या एक आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, जरी ती रागीट दिसते, तरी त्यामध्ये हास्याचा एक विशेष अंग आहे.

Dhanshri Shintre

सोशल मीडियाचे जग खूपच रंगीबेरंगी आणि मनोरंजक आहे. येथे दररोज वेगवेगळ्या व्हिडिओ आणि फोटोचा ओघ सुरु असतो. जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल, तर तुमच्या फीडवर कधी गोंडस मुलांचे व्हिडिओ येतात, तर कधी वृद्ध व्यक्तींच्या गमतीदार व्हिडिओंनी तुमचे मनोरंजन होते.

यावरून, आता एक असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एक आजी फोन करत असताना एका रेकॉर्डेड आवाजामुळे तिचा राग ऐकायला मिळतो. या मजेदार व खमंग उत्तरामुळे आजीच्या व्हिडिओला प्रचंड प्रमाणात लोकं पसंती देत आहेत, आणि हा व्हिडिओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

या व्हिडिओमध्ये एक आजी फोन करत असल्याचे दिसते. फोन रिंग झाल्यावर दुसऱ्या टोकावर असलेल्या व्यक्तीने फोन उचलला नाही, आणि त्यानंतर एक रेकॉर्डेड संदेश ऐकू येतो. ज्यामध्ये 'तुम्ही ज्याला फोन करत आहात तो उत्तर देत नाहीये' असे सांगितले जाते. हे ऐकून आजी रागावली आणि ती म्हणाली, मग तू का उत्तर देत आहेस? आजीचा हा उत्तर देण्याचा अंदाज आणि रागीटपणा लोकांना खूपच हसवणारा वाटला. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.

तुम्ही नुकताच पाहिलेला व्हिडिओ ट्विटर प्लॅटफॉर्मवर @Harsh_MZP या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, संपूर्ण कस्टमर केअर घाबरले आहे. या व्हिडिओला ११ हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. ज्यामुळे व्हिडिओ सोशल मीडियावर आणखी लोकप्रिय होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात हैदराबाद गॅझेटनुसार 421 अर्जापैकी 377 प्रमाणपत्र वितरित

Friday Horoscope: आर्थिक लाभ, प्रेमाची कबुली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

SCROLL FOR NEXT