Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : नाद करा पण यांचा कुठं; बस पकडण्यासाठी आजोबा थेट खिडकीतून आत शिरले, अनोखा जुगाड व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

सध्या उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. त्यामुळे अनेकांची पाऊले गावी वळत आहेत. गाव म्हटलं की पाहिले आठवते एस्टी बस. गावी एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना तालुक्याला बाजारासाठी जाताना हमखास एस्टीबसमधून प्रवास करावा लागतो. बसमध्ये सीट पकडण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही शक्कल लढवत असतो. अशात सोशल मीडियावर एका आजोबांचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बस पकडण्यासाठी काही व्यक्ती खिडकीतून रुमाल किंवा बॅग टाकून सीट आपली असल्याचा दावा करतात. मात्र या आजोबांनी थेट खिडकीतून बसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रयत्नाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही देखील पोट दुखेपर्यंत हसत राहाल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बस स्थानकात बस आली आहे. बस आलेली पाहून सर्वजण दरवाजाजवळ येऊन उभे आहेत. एक एक करून आतमध्ये जाऊन जागा फिक्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या सर्वांमध्ये आपला नंबर कधी येणार आणि आपल्याला सीट मिळणार की नाही या विचाराने एक आजोबा तेथेच उभे आहेत.

काही वेळाने या आजोबांना शक्कल सुचते आणि ते थेट खिडकी जवळ येतात आणि तेथून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. आता बसची खिडकी लहान असल्याने त्यांना सहज आतमध्ये जाता येत नाही. आधी ते खिडकीला लटकताता. त्यानंतर येथून आपले पाय बसमध्ये ठेवतात आणि जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र जागा लहान असल्याने या आजोबांची काहीशी फजिती झाल्याचं दिसत आहे.

आजोबांचा स्टंट पाहून बस चालक खाली येतात आणि आजोबांना असं करण्यापासून रोखतात. मात्र कुणाचं ऐकतील ते आजोबा कसले. तरीही आजोबा तसेच खिडकीला लटकून राहतात. तिथे असलेल्या अन्य प्रवाशांनी आजोबांचा एका व्हिडिओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला आहे. आजोबा आता इतके आघव आहेत, तर लहानपणी किती अघाव असतील अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT