GOVINDA SECOND MARRIAGE CLAIM FACT CHECK saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: गोविंदानं केलं दुसरं लग्न? दुसऱ्या पत्नीसोबत गोविंदा राजाच्या दर्शनाला?

Govinda-Komal Rani Marriage Rumour: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...अभिनेता गोविंदाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय...त्याने दुसरं लग्न केल्याचा दावा करण्यात आलाय...त्याच्या सोबत असलेल्या अभिनेत्रीच्या डोक्यावर कुंकू दिसतंय...त्यामुळे चर्चांना उधाण आलंय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात..

Sandeep Chavan

बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची को-स्टार कोमल रानी स्वर्णकार यांच्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ उडालीय... कोमल रानी हिच्या कपाळावरील कुंकुवामुळे गोविंदाने तिच्याशी लग्न केल्याचा दावा करण्यात आलाय...हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय...पण, खरंच गोविंदा आणि कोमल रानीचं लग्न झालंय का...? असा प्रश्न विचारला जातोय...

गोविंदा आणि कोमल रानी हे दोघे नुकतेच मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या दरबारात बाप्पाच्या दर्शनासाठी एकत्र पोहोचले होते...यादरम्यान कोमल रानीचा पारंपरिक लूक आणि तिच्या माथ्यावर दिसलेलं कुंकू पाहून सोशल मीडियावर त्यांच्या गुप्त विवाहाच्या चर्चांना उधाण आलंय...विशेष म्हणजे, त्यांच्या काही तास आधी गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी तिथे आली होती...

पहिल्या व्हिडिओत गोविंदा आणि त्याची को स्टार कोमल रानी दोघे एकत्र आल्याचं दिसतंय... तर दुसऱ्या व्हिडिओत गोविंदाची पत्नी सुनीता दिसतेय... दोघेही वेगवेगळे दर्शनाला आल्याने चर्चांना आणखीनंच उधाण आलं...कोमल रानीने लाल आणि पिवळ्या रंगाचा पारंपरिक पोशाख परिधान केलाय...पण, खरंच गोविंदाने लग्न केलंय का...? याचीच उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागलीय...यापूर्वीही कोमल आणि गोविंदा एकत्र दिसल्यावरून पत्नी सुनीताने गोविंदावर भडकली होती...त्यावेळीही दोघांचं प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती...मात्र, आम्ही आता याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता काय सत्य समोर आलं पाहुयात...Govinda Second Marriage Claim Fact Check: Viral Video With Komal Rani Is Misleading

बाप्पाच्या दर्शनापूर्वी कोमलच्या कपाळावर कुंकू नव्हतं

लालबाग राजाचं दर्शन घेतल्यावर भटजीने कुंकू लावलं

गोविंदाने दुसरं लग्न केल्याच्या अफवा

कोमल रानी आणि गोविंदाने चित्रपटात एकत्र काम केलंय

लालबागच्या राजाच्या दरबारात घडलेल्या या प्रकाराला सोशल मीडियावर चुकीचा रंग देण्यात आला...गोविंदा आणि कोमलच्या विवाहाच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत गोविंदाने दुसरं लग्न केल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : १९ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; अनेक राज्यांना वादळी तडाखा, ताशी ८० किमी वेगाने वाहणार वारे

Swiggy Instamartमध्ये उंदीर अन् झुरळांचा सुळसुळाट! Amazonच्या गोदामासह १० अन्न आस्थापनांवर FDAचा बडगा

Maharashtra News Live Update: खाजगीकरणावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या PA ला १,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; टीप मिळाली अन् ACB ने अलगद टिपला

भाजपला निवडणुकीआधी मोठा धक्का; केंद्रातील मित्रपक्षानं सोडली साथ, दुसऱ्या पक्षाशी बांधली युतीची गाठ

SCROLL FOR NEXT